MPSC : एमपीएससीच्या ‘यथावकाश’ धोरणाचा विद्यार्थ्यांना फटका; परीक्षा पुढे ढकलल्यानंतर नवीन तारखेचा आयोगाला विसर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलताना नवीन तारखेसाठी ‘यथावकाश’ हे धोरण राबविले आहे. नवीन तारीख न देता परीक्षा पुढे ढकलण्याच्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
MPSC Policy Hits Students Commission Forgets New Date After Postponing Exam
MPSC Policy Hits Students Commission Forgets New Date After Postponing Exam Sakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलताना नवीन तारखेसाठी ‘यथावकाश’ हे धोरण राबविले आहे. नवीन तारीख न देता परीक्षा पुढे ढकलण्याच्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक परीक्षांच्या बाबतीत आयोगाला तारखेचा विसर पडतो की काय, असे प्रश्न उमेदवार उपस्थित करत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

एमपीएससीने नुकतेच एक परिपत्रक जाहीर करून समाज कल्याण विभाग परीक्षा २०२३ व राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत असे कळवले आहे. या परीक्षा पुढे ढकलताना आयोगाने परिपत्रकात यथावकाश हा शब्द वापरलेला आहे. कोरोना काळामध्येही परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या गेल्या होत्या.

तेव्हा देखील आयोगाने यथावकाश हा शब्द वापरलेला होता. सतत पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षांना त्रस्त झालेला राजेश सांगतो,‘‘परीक्षा पुढे ढकलताना नव्या तारखेची घोषणा करणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासाचे नियोजन करता येते. आयोगाच्या या अट्टहासामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. ’’

उमेदवारांच्या अडचणी

- परीक्षांच्या तयारीसाठी दरमहा आठ ते दहा हजार रुपये खर्च येत आहे.

- वारंवार परीक्षा पुढे ढकलल्याने आर्थिक नियोजन कोलमडते

- लग्नासाठीचे वाढते वय, मुलींना घरून शिक्षणासाठी मिळणारा अपुरा कालावधी

- परीक्षा पुढे ढकलल्याने संभ्रमाची अवस्था निर्माण होते

- परीक्षेची निश्चिती नसल्यामुळे अनेकांना करिअर सोडावे लागते

- पुढील परीक्षांचे नियोजन करता येत नाही

उमेदवारांचे प्रश्न

- केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा पुढे ढकलताना नवीन तारीख देत असेल; तर एमपीएससीला काय अडचण?

- परिपत्रकात यथावकाश उल्लेख करत आयोग तारीख घोषित करण्यास विसरते का?

- उमेदवारांचा सारासार विचार करत आयोग निर्णय घेणार का नाही?

आलेले नैराश्य व त्यातून व्यक्त होणाऱ्या तीव्र भावना यांचा विचार राज्य लोकसेवा आयोगाने नक्कीच केला पाहिजे. उमेदवारांचे वाढते वय, आर्थिक नियोजन, मुलींना शिक्षणासाठी मिळणाऱ्या अपुऱ्या संधी, याबाबत आयोगाने विचारात घेऊन तत्काळ नवीन तारखा द्याव्यात.

- महेश बडे, एमपीएससी स्टुडंट्स राईट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.