MPSC PSI Result : पोरानं कष्टाचं पांग फेडलं! ऊसतोड कामगाराच्या मुलाची PSI परीक्षेत उत्तुंग भरारी

ऊसतोड कामगार (Sugarcane Worker) म्हणून राबणाऱ्या आई-वडिलांच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घालून त्यांच्या कष्टाचे पांग फेडले.
MPSC PSI Result 2023 Mahesh Khade
MPSC PSI Result 2023 Mahesh Khadeesakal
Updated on
Summary

माझ्यासाठी हे यश मुळीच सोपे नव्हते. ऊसतोड कामगार असूनही माझ्या आई-वडिलांनी परिस्थिती माझ्या शिक्षणाच्या आड येऊ दिली नाही.

दहिवडी : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार (Sugarcane Worker) म्हणून राबणाऱ्या आई-वडिलांच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घालून त्यांच्या कष्टाचे पांग फेडले.

MPSC PSI Result 2023 Mahesh Khade
NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

माण तालुक्यातील जाशीतील दिगंबर खाडे व प्रमिला खाडे या ऊसतोड कामगार दांपत्याचा मुलगा महेश दिगंबर खाडे (Mahesh Khade) याने काल जाहीर झालेल्या लोकसेवा आयोगाच्या (MPSC PSI Result 2023) पोलिस उपनिरीक्षक पदाच्या निकालात राज्यात १८ वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.

महेशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जाशी गावातच झाले. उच्च माध्यमिक शिक्षण दहिवडी कॉलेज दहिवडी येथे झाले. शैक्षणिक कर्जाच्या साह्याने टेक्स्टाईल अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्याने पुणे येथे नोकरी केली. दीड वर्ष नोकरी केल्यानंतर पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते.

MPSC PSI Result 2023 Mahesh Khade
NCP Crisis : ज्या पक्षात मी राहिलो, त्या पक्षाचा विश्वासघात कधी केला नाही; भास्कर जाधवांचा तटकरेंवर थेट वार

त्याने नोकरीचा राजीनामा दिला व पूर्णवेळ स्वतःला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात झोकून दिले. मात्र, यश एवढे सहजसाध्य नव्हते. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत दोनवेळा त्याला अपयशाला सामोरे जावे लागले; चिकाटी न हरता त्याने पुन्हा नेटाने अभ्यास केला.

त्याच्या सातत्यपूर्ण कष्टाला तिसऱ्या प्रयत्नात यश येऊन त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. अतिशय सामान्य घरातील महेशने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

MPSC PSI Result 2023 Mahesh Khade
MPSC PSI Result : कष्टाचं चीज झालं; गवंड्याच्या पोराची पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी

माझ्यासाठी हे यश मुळीच सोपे नव्हते. ऊसतोड कामगार असूनही माझ्या आई-वडिलांनी परिस्थिती माझ्या शिक्षणाच्या आड येऊ दिली नाही. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतरच्या कसोटीच्या काळात माझ्या ताई व दाजींनी मला पाठबळ दिले. माझ्या सहकाऱ्यांनी मला कायम प्रोत्साहित केले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी हे यश प्राप्त करू शकलो.

-महेश खाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.