बहुविध बुद्धिमत्ता

बुद्धिमत्तेचा विचार करताना आपण सामान्यतः शैक्षणिक प्रगती किंवा क्षमता अशा एखाद्याच घटकाचा विचार करतो. मात्र, हा विचार खूप मर्यादित ठरतो.
Multiple artificial intelligences
Multiple artificial intelligencessakal
Updated on

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

बुद्धिमत्तेचा विचार करताना आपण सामान्यतः शैक्षणिक प्रगती किंवा क्षमता अशा एखाद्याच घटकाचा विचार करतो. मात्र, हा विचार खूप मर्यादित ठरतो. हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तेवर आधारित ‘फ्रेम्स ऑफ माइंड’ नावाचे पुस्तक १९८३ मध्ये लिहिले. त्यात ९ प्रकारच्या विविध बुद्धिमत्तांचा ऊहापोह केला आहे. बहुविध बुद्धिमत्तांची माहिती खालीलप्रमाणे -

भाषिक बुद्धिमत्ता

आवड व क्षमता : बोलणे आणि लिहून व्यक्त होण्यासाठी भाषा कुशलतेने वापरण्याची क्षमता. यात कविता लिहिणे, सर्जनशील संकल्पना मांडणे, रूपककथा आणि व्यवसायाशी संबंधित लिखाण करणे या कौशल्यांचा समावेश होतो.

करिअर : वकील/प्रशिक्षक/वक्ता/रेडिओ जॉकी/पॉडकास्टर/निवेदक/लेखक/पत्रकार

लॉजिक-गणितीय बुद्धिमत्ता

आवड आणि क्षमता : तर्कशास्त्र (लॉजिक) वापरण्याची क्षमता, समीकरणे आणि प्रमेय समजून घेऊन ते सिद्ध करणे, गणिते सोडवणे.

करिअर : गणितज्ज्ञ/संशोधन/वित्त/लेखापाल/सांख्यिकीशास्त्रज्ञ/वैज्ञानिक/डेटा विश्लेषक

अवकाशीय बुद्धिमत्ता (चित्रज्ञान)

आवड आणि क्षमता : व्हिज्युअल किंवा अवकाशीय (स्पेस) जग अचूकपणे समजून घेण्याची क्षमता, रेखाचित्रे, दिशानिर्देश, कोडे तयार करणे आणि नकाशावाचन करणे.

करिअर : पायलट/बुद्धिबळपटू/आर्किटेक्ट/ग्राफिक आर्टिस्ट/इंटेरिअर डेकोरेटर

शारीरिक बुद्धिमत्ता

आवड आणि क्षमता : संपूर्ण शरीर किंवा हात किंवा तोंडासारखा एखादाच भाग कौशल्याने वापरण्याची क्षमता या लोकांमध्ये असते. यामुळे एखादी समस्या सोडवण्यासाठी किंवा उत्पादने तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. यात शारीरिक समन्वय, संतुलन, निपुणता, सामर्थ्य आणि लवचिकता समाविष्ट आहे.

करिअर : नर्तक/क्रीडापटू/परफॉर्मिंग आर्टिस्ट/मेकॅनिक/कारागीर/शरीरावर उपचार करणारे

सांगीतिक बुद्धिमत्ता

आवड आणि क्षमता : संगीताच्या विविध रचना समजून घेणं, त्यावर काम करणं. ताल, लय, स्वर यांचं ज्ञान असणं.

करिअर : गायक/संगीतकार/डीजे

सामाजिक बुद्धिमत्ता (इंटरपर्सनल)

आवड आणि क्षमता : इतर लोकांचे हेतू, प्रेरणा आणि इच्छा समजून घेण्याची क्षमता ठेवणे. त्यांच्याशी सकारात्मक संबंध निर्माण करणे आणि त्याद्वारे कार्यभाग साध्य करणे.

करिअर : शिक्षक/मानसशास्त्रज्ञ/व्यवस्थापक/विक्रेते/जनसंपर्क अधिकारी

आत्मविषयक बुद्धिमत्ता (इंट्रापर्सनल)

आवड आणि क्षमता : स्वत:ला समजून घेण्याची क्षमता, स्वतःमधील भीती आणि इतरही क्षमतांची जाणीव असणे आणि स्वतःच्या जीवनाचे नियमन करण्यासाठी या माहितीचा प्रभावीपणे वापर करणे.

करिअर : थेरपिस्ट/मानसशास्त्रज्ञ/समुपदेशक/उद्योजक

निसर्गवादी बुद्धिमत्ता

आवड आणि क्षमता : निसर्गात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि हवामानविषयक कुतूहल असणे. त्यांचा अभ्यास आणि विश्लेषण करण्याची क्षमता ठेवणे.

करिअर : वनस्पतिशास्त्रज्ञ/जीवशास्त्रज्ञ/खगोलशास्त्रज्ञ/हवामानशास्त्रज्ञ/भूवैज्ञानिक/शेतकरी

अस्तित्त्ववादी बुद्धिमत्ता

आवड आणि क्षमता : जीवन आणि स्वतःच्या अस्तित्त्वाविषयक प्रश्‍नांचा सखोल शोध घेण्याची क्षमता. आपल्या निवडीचा प्रभाव समजून घेणं आणि भविष्याविषयी व्यापक दृष्टिकोन ठेवणं.

करिअर : तत्त्वज्ञानी/धर्मशास्त्रज्ञ/उपदेशक आपल्या सर्वांकडे अशा प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत, परंतु आनुवंशिकता, शिकण्याच्या संधी किंवा अनुभव यांमुळे त्यात निश्‍चितच फरक आढळू शकतो. पारंपरिक मूल्यमापन पद्धतींमध्ये विशिष्ट प्रकारच्या बुद्धिमत्तेला अधिक महत्त्व दिले जात असले तरी, आपण आपला स्वतःचा शिकण्याबाबतचा दृष्टिकोन विकसित करू शकतो. यामुळे आपले पाल्यदेखील त्यांच्यातले कौशल्य व सामर्थ्य ओळखून त्यांचा विकास करू शकतात. तुम्हीदेखील त्यांना या प्रक्रियेत मदत करू शकता. बुद्धिमता किंवा कौशल्य कशा प्रकारे विकसित करावे? याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी pranjal_gundesha या किंवा द इंटेलिजन्स प्लस नावाच्या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.