तब्बल १२ लाख पदव्या मुंबई विद्यापीठाच्या डिजीलॉकरवर उपलब्ध

mumbai university
mumbai universitysakal media
Updated on

मुंबई : मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) मागील सात वर्षाचे १२ लाखापेक्षा जास्त पदवी प्रमाणपत्रे (degree certificate) डिजीलॉकरवर (Digilocker) उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रावर आघाडीवर असलेले मुंबई विद्यापीठ हे डिजीलॉकरवर पदवी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात राज्यात प्रथम स्थानावर (first in Maharashtra) पोहोचले आहे.

mumbai university
दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क परत कधी मिळणार?

विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्रे नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरीच्या (एनएडी) माध्यमातून डीजीलॉकरमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले होते. यानुसार विद्यापीठाने ही सोय उपलब्ध करून दिली असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. विद्यार्थ्याने डिजीलॉकरवर नोंदणी केल्यास त्याला त्याचे पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होईल.

मुंबई विद्यापीठाने पहिल्या टप्प्यात वर्ष २०१४ ते २०२० या सात वर्षाचे १२ लाख ४३ हजार ५३४ पदवी प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर उपलब्ध करून दिलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण पाच विद्यापीठांची २४ लाख ८८ हजार ७२२ पदवी प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर उपलब्ध आहेत, यात मुंबई विद्यापीठाचा वाटा ५० टक्क्यापेक्षा जास्त आहे. दुसऱ्या टप्प्यात मागील पाच वर्षाचे ५ लाखापेक्षा जास्त पदवी प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर उपलब्ध केली जाणार आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील केंद्रीय संगणक सुविधा कक्षाचे वरिष्ठ यंत्रणा प्रोग्रामर डॉ. प्रविण शिनकर हे नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरीचे (एनएडी) मुंबई विद्यापीठाचे नोडल ऑफिसर म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनी १२ लाख पदवी प्रमाणपत्रे डीजीलॉकरमध्ये उपलब्ध करून दिले असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

डीजी लॉकरमधील पदवी प्रमाणपत्रांची संख्या

वर्ष पदवी प्रमाणपत्रांची संख्या

२०१४ १,८५,४६७

२०१५ १,६१,९१४

२०१६ १,६८,७४३

२०१७ १,८९,५३८

२०१८ १,८५,९८१

२०१९ १,६८,२३९

२०२० १,९७,९२७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()