एकही विद्यार्थी आॅनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार नाही!

लवकरच मार्गदर्शक सूचना; शालेय शिक्षण आयुक्तांचा आदेश
Online Education
Online EducationEsakal
Updated on

मुंबई : राज्यात सरकारने (Mva Government) शाळा सुरू केल्यानंतरही कोरोनाची भीती (corona fear) तसेच इतर कारणांमुळे अनेक विद्यार्थी (students) अद्याप शाळेत जाऊ शकलेले नाहीत. अशा पाल्यांना आॅनलाईन शिक्षण (online education) देण्याची सूचना राज्य सरकारने केली होती; मात्र शाळा सुरू करण्याच्या शासन निर्णयात (GR) त्याबाबतचा उल्लेखच नसल्याने अनेक संस्थांचालकांनीही आॅनलाईन शिक्षण बंद केले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत असल्याने अखेर शिक्षण विभागाने शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (SCERT) आॅनलाईन शिक्षणासंदर्भात मार्गदर्शक सूचना (Guidelines) तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

Online Education
Drugs Case: शाहरुखला झटका; आर्यनचा जामीन फेटाळला

शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली आहे. राज्यात शहरी भागात आठवी ते बारावी; तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे; मात्र शाळेत उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना बंधनकारक नसून विविध कारणांमुळे उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरूच राहील, असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते; मात्र शासन निर्णयात विद्यार्थ्यांना शाळेसोबतच ऑनलाईन शिक्षण देण्याची तरतूद नसल्याने संस्थाचालकांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे.

त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने यावर पर्याय काढावा, अशी मागणी पालकांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आता घरी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एससीईआरटीकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. यातून एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारची तजवीज यात केली जाणार असल्याचे शालेय शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी सांगितले.

Online Education
शिवसेना भाजपाला झटका देणार? दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार

कोरोनामुळे संभ्रम

ग्रामीण भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उपस्थित राहण्याचे प्रमाण वाढत आहे; तर शहरी भागात विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणे बंद केले असून त्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आमच्याही मुलांना वेगळे ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

"विविध कारणांमुळे शाळेत उपस्थित राहू न शकणारे विद्यार्थी अभ्यासक्रम मागे राहू नये म्हणून लवकरच एससीईआरटीच्या नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे."
- विशाल सोळंकी, शालेय शिक्षण आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.