Navy Agniveer Recruitment 2022 : बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे विज्ञान विषयासह मान्यताप्राप्त मंडळाचे 10+2 प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Navy Agniveer Recruitment
Navy Agniveer Recruitmentgoogle
Updated on

मुंबई : भारतीय नौदलाने अग्निवीरची भरती सुरू केली आहे. ही भरती बारावी पास SSR ची पदे भरण्यासाठी करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. या भरतीसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. (Navy Agniveer Recruitment 2022)

अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जुलै २०२२ आहे. यापूर्वी, नौदलात एमआरच्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २०० पदांच्या भरतीसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

Navy Agniveer Recruitment
'2032 पर्यंत सैन्यात 50 टक्के 'अग्निवीर' असणार, दरवर्षी दीड लाख तरुणांची होणार भरती'

नौदल अग्निवीर SSR भर्ती 2022 रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - २ हजार ८००

पुरुष - २ हजार २४० पदे

महिला – ५६० पदे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ जुलै २०२२

Navy Agniveer Recruitment
भारतीय सैन्याकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवताण.... ४० जागांवर भरती सुरू

शैक्षणिक पात्रता

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे विज्ञान विषयासह मान्यताप्राप्त मंडळाचे 10+2 प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा संगणक विज्ञान यापैकी कोणताही एक विषय असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

प्रथमतः इयत्ता 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल आणि नंतर निवडलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीद्वारे अंतिम निवड केली जाईल.

वय मर्यादा

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांचा जन्म 1 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान झालेला असावा.

असा करा अर्ज

१. अग्निवीर एसएसआर रिक्त पदासाठी www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

२. जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केली नसेल, तर तुमच्या ई-मेल आयडीसह वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर नोंदणी करा.

३. त्यानंतर नोंदणीकृत ईमेल आयडीने लॉगिन करा आणि चालू संधी वर क्लिक करा.

४. क्लिक केल्यानंतर, अर्ज करा बटणावर क्लिक करून संपूर्ण अर्ज भरा.

५. शेवटी आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती आणि चांगल्या प्रतीची छायाचित्रे अपलोड करा. लक्षात ठेवा फोटोची पार्श्वभूमी निळी असावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()