- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
नेतृत्वगुण हा अनेक कौशल्यांचा एकत्रित मिलाफ असतो आणि अनेक गुणांमधून तो विकसित होत जातो. आपल्या दैनंदिन जीवनात विविध गोष्टी शिकणे, प्रयोग करणे, अमलात आणणे आणि त्यातून पुन्हा नवे काही शिकणे ही सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे.
लहानपणापासूनच मुलांना या प्रक्रियेची सवय लावली, तर ते अधिक यशस्वी होण्यासाठी आणि त्यांच्यातील नेतृत्वकौशल्ये विकसित होण्यात नक्कीच मदत होईल. जागतिक स्तरावर झालेल्या अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, नेतृत्वगुण विकसित करण्याचे विविध मार्ग आहेत. त्यापैकी काही मार्ग खालीलप्रमाणे -