Bouncer Job : तुम्हालाही 'बाऊंसर' व्हायचंय? यासाठी काय करावं लागेल, किती मिळतो पगार? जाणून घ्या सविस्तर..

तरुणाईला गेल्या काही वर्षांत मिळालेला हा नवा व्यवसाय चांगलाच रुजला आहे.
Bouncer Training Centre)
Bouncer Training Centre)esakal
Updated on
Summary

एक दिवसापासून ते आठवड्यापर्यंत बाऊंसरना कामावर घेतले जाते. विशेषतः उच्चवर्गियांच्या सोहळ्यांसाठी मागणी अधिक असते.

सांगली : काळ्या रंगाची स्लीम फिट सफारी... चमकणारे बूट... डोळ्यांवर गॉगल... कानात ब्लू-टूथ इअरफोन... रूबाबदार चालणं अन् लक्ष वेधून घेणारं व्यक्तिमत्त्व... बॉडी गार्ड (Bodyguard) किंवा बाऊंसर तुमच्या नजरेसमोर आला असेल. तरुणाईला गेल्या काही वर्षांत मिळालेला हा नवा व्यवसाय चांगलाच रुजला आहे. इतका की ‘बाऊंसर ट्रेनिंग सेंटर’ (Bouncer Training Centre) सुरू झाले आहेत. काहींनी पुरवठादार कंपन्या स्थापन करून शंभर-शंभर तरुणांची फळी हाताशी ठेवली आहे.

‘‘साहेब, मी वाढपी होतो. समारंभात जेवण वाढायला जायचो. मित्राने सल्ला दिला, बाऊंसर हो. मी दोन आठवड्याचे ट्रेनिंग घेतले. महिनाभर सगळे व्हिडिओ पाहिले. एका कंपनीत नोकरी पकडली. आता दिवसाला एक हजार ते १२०० रुपये मिळतात. महिन्यातून १२ ते १५ दिवस काम मिळते. अन्य दिवशी अन्य काम करतो. दोन जोड सफारी, एक गॉगल, इअरफोन आणि एक बूट एवढीच गुंतवणूक करावी लागली,’’ गेल्या दोन वर्षांपासून हे काम करणारा सूरज ‘सकाळ’शी बोलत होता.

Bouncer Training Centre)
Degree Education : पदवी शिक्षण आता 4 ऐवजी 3 वर्षांचे होणार; नव्या शैक्षणिक धोरणाची यंदापासूनच अंमलबजावणी

एक दिवसापासून ते आठवड्यापर्यंत बाऊंसरना कामावर घेतले जाते. विशेषतः उच्चवर्गियांच्या सोहळ्यांसाठी मागणी अधिक असते. कुटुंबातील प्रमुख व्यक्तींसमवेत राहणे, मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहणे, सोहळ्यात इकडून तिकडे अन् तिकडून इकडे फिरत राहणे, एवढे काम असते. कुणाच्या जीवाला काही धोका नसतो, केवळ शो-बाजी! गोंधळ झालाच तर या बाऊंसरना काम लागते. त्यासाठीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू आहेत. काही निवृत्त सैनिकांनी त्या सुरू केल्या आहेत. या विषयावर दोन हिंदी सिनेमे आले आणि गाजले.

पहिला होता, सलमान खानचा ‘बॉडी गार्ड’ आणि दुसरा तमन्नाचा ‘बबली बाऊंसर’... सामान्य कुटुंबातील उत्तम व्यक्तिमत्त्वाच्या तरुणाईला या नव्या क्षेत्राने रोजगार दिला आहे. व्यायामाची आवड आणि भाषेचे ज्ञान, संयम या गोष्टी ज्याच्याकडे आहेत, तो उत्तम बाऊंसर होऊ शकतो. अनेक बाऊंसर नाहक गोंधळ करतात आणि त्याचा फटका अनेकदा राजकीय नेत्यांना बसला आहे. मिरजेतील एका युवा नेत्याने बाऊंसर घेतले, तो आता लोकांना त्यांच्या जवळ फिरकू देत नाही, मित्राने खांद्यावर हात ठेवला तरी तो बाऊंसर हात झटकायला पुढे येतो...अर्धवट ज्ञान हे या क्षेत्रात धोकादायक आहेच.

Bouncer Training Centre)
Sangli Lok Sabha : अचानक स्ट्राँगरूमचा अलार्म वाजला अन् प्रशासनाची उडाली धावपळ, मत यंत्राच्या गोदामाला कडेकोट बंदोबस्त

बाऊंसर व्हायचंय तर...

  • उंची ५ फूट १० इंचपेक्षा अधिक असलेली चांगली

  • व्यक्तिमत्त्व आकर्षक, तब्येत मजबूत असावी

  • मराठी, हिंदी चांगली बोलता यावी, इंग्रजी किमान समजणे आवश्यक

  • सैन्यातून निवृत्त, होमगार्ड आदींना या व्यवसायात अधिक संधी

  • स्वभाव रागीट नसावा, संयम महत्त्वाचा

किती होते कमाई...?

  • सुरक्षा पुरवठा कंपन्यांकडे नोकरी

  • मासिक वेतन १० हजारांपासून पुढे निश्‍चित

  • बाऊंसर म्हणून काम आल्यास दिवसाला १२०० ते १५०० रुपये कमाई

  • अन्य वेळी विविध कंपन्यांमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम

Bouncer Training Centre)
डोक्यावर भगवी पगडी घालून गुरुद्वारात रांगेत बसलेल्या लोकांना PM मोदींनी दिली 'लंगर'ची सेवा

सैन्यातून निवृत्तीनंतर सुरक्षारक्षक व बाऊंसर पुरवठा कंपनी सुरू केली. आज शंभर तरुण माझ्याकडे आहेत. सांगली, सातारा, पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात काम करतो. बाऊंसर ही व्यवस्था सुरक्षेसह आकर्षण, स्टेटस सिम्बॉल, फॅशन म्हणून अधिक चालू लागली आहे. समाजात प्रभावासाठी गळ्यात सोनसाखळ्यांची संख्या आणि आजूबाजूला बाऊंसर ही गरज असल्यासारखी स्थिती आहे. त्याचा सामान्य लोकांवर प्रभाव पडतोय, हे नक्की.

- शहाजी कदम, बाऊंसर पुरवठादार

खूप पैसे कमावले तरी मानमरातब मिळतोच, लक्ष वेधले जातेच, असे नाही. अशा वेळी विविध क्लृप्त्या शोधून समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. बाऊंसर ही संकल्पना त्यापैकीच एक आहे. सुरक्षेचे कारण हा त्यातील एक भाग आहे, मात्र त्या तुलनेत शो-बाजीला अधिक महत्त्व आले आहे. एक चांगले आहे, यातून तरुणांना एक वेगळी व्यावसायिक संधी उपलब्ध झाली आहे. रोजगार म्हणून त्याकडे पाहायला हरकत नाही.

- अर्चना मुळे, मानसशास्त्र अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()