Nilkrishna Gajre: JEE Mains परीक्षेत विदर्भातील निलकृष्ण गजरे देशात पहिला; शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी

शेतात राबणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचं त्यानं चीज करुन दाखवलं आहे.
 JEE Mains
Nilkrishna Gajreesakal
Updated on

मंगरूळपीर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलाने देशपातळीवर आपला डंका वाजविला असून मंगरूळपीर तालुक्यातील बेलखेड येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलांनं जेईई परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळून इतिहास रचून देशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळं गावकऱ्यांसह देशभरातून त्याचं मोठं कौतुक केलं जात आहे.

आयआयटी सारख्या केंद्रीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी गाह्य धरल्या जाणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल नुकताच लागलेला असून देशभरात 23 तर महाराष्ट्रातुन 3 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. त्यामध्ये वाशिम सारख्या छोट्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या निलकृष्ण गजरेचा नंबर असून तो देशातून प्रथम आला आहे.

निलकृष्ण हा मंगरूळपीर तालुक्यातील बेलखेड येथील मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा असून त्याचे वडील हे गावी शेती करतात. त्यांचं अवघं बारावी पर्यंत शिक्षण झालं असून आपलं उच्च शिक्षणाचं अधुर राहिलेलं स्वप्न मुलानं पूर्ण करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळं मुलाच्या शिक्षणावर सुरुवातीपासूनच त्यांनी भर दिला. त्याला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत न टाकता त्यांनी सुरुवातीलाच अकोला येथील त्याच्या आत्याकडं पाठवून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले, त्यानंतर कारंजा येथील जेसी चवरे हायस्कूल येथे त्याने पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. (Marathi Tajya Batmya)

 JEE Mains
Vinod Patil: विनोद पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये झाली 40 मिनिटं चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?

दहावीत त्याने ९८ टक्के गुण मिळवून तो प्रथम आला होता. त्यामुळं त्याच्या वडिलांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याची जेईईची तयारी सुरू केली. तयारी करत असताना त्याने इन्स्टिट्यूट ची परीक्षा दिल्यानंतर त्याला स्कॉलरशिप मिळाली त्यातून त्याने ऑनलाईन क्लासेस लावले. अकरावी बारावी साठी त्याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील बुरूनले कॉलेज येथे टाकले सध्या तो इथेच बारावीचे शिक्षण घेत असताना त्याने जेईईची परीक्षा दिली. सर्व विषयात त्याने पैकीच्या पैकी गुण मिळवत तो १०० टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात पहिला आला. आता पुढे आयआयटीला त्याचा नंबर लागावा आणि त्याने कॉम्पुटर इंजिनियर व्हावं अशी त्याच्या बाबाची इच्छा आहे आणि त्यासाठी वडील म्हणून कितीही कष्ट घेण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा विश्वास त्याच्या वडिलांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

नीलकृष्णाचा देशात प्रथम क्रमांक आल्यामुळं त्याच्या वडिलांना देशभरातून अभिनंदनचे फोन येत आहेत. तर बरेच जण त्यांच्या मुलांसाठी ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत आणि निर्मलकुमार गजरे ही त्यांच्या मुलाने कशी तयारी केली याविषयी त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

 JEE Mains
Ethanol Production: इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली; सरकारच्या निर्णयामुळं साखर कारखान्यांना मोठा दिलासा

आजोबांची इच्छा झाली पूर्ण

नीलकृष्णच्या आजोबाकडे पंधरा एकर शेती आहे. मात्र शेतीत येणाऱ्या सततच्या संकटामूळ शेती परवडत नसल्यानं मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि नोकरी करावी अशी निलकृष्णाच्या आजी-आजोबांची इच्छा होती मात्र निलकृष्णाच्या वडिलांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन शेतीत वळले त्यांनी उच्च शिक्षण घेतले नाही. त्यामुळे नीलकृष्णच्या आजी आजोबांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते मात्र आता नातू त्यांचं स्वप्न पूर्ण करत असून तो राज्यातून प्रथम आल्यामुळे त्यांनाही मोठा आनंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.