आजही युवक पुणे, मुंबईसह बाहेरच्या राज्यात नोकरी व्यवसायानिमित्त जाताना दिसत आहेत.
सातारा : जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरीच्या संधी अल्प असूनही जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत नोकरीसाठी (Job) सेवा योजना व कौशल्य विकास कार्यालयाकडे ९७०१ जणांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांचे चार मेळावे झाले असून, या माध्यमातून ११४ जणांची निवड झाली आहे. केवळ ३० महिलांना (Women) रोजगार मिळाला आहे. नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात मोठा उद्योग आणून युवकांचे स्थलांतर थांबविणे गरजेचे बनले आहे.