निर्णय घ्यायला शिकवणारे पुस्तक

आपण आयुष्यात बऱ्याचदा द्विधामनस्थिती अनुभवतो. तारुण्यावस्थेत अशी मनस्थिती होणे अगदी स्वाभाविक असते.
Nirnay Ghyava Kasa Book
Nirnay Ghyava Kasa Bookkal
Updated on

आपण आयुष्यात बऱ्याचदा द्विधामनस्थिती अनुभवतो. तारुण्यावस्थेत अशी मनस्थिती होणे अगदी स्वाभाविक असते. छोट्या छोट्या गोष्टीत निर्णय घेताना नेमके काय करावे? माझे हित कशात आहे? कोणता निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा फायदेशीर ठरला, तरी दीर्घकालीन उपयुक्त ठरणारा नाही? कोणता निर्णय दीर्घकालीन उपयोगी ठरेल? यांसारख्या द्विधा अवस्थेत आपण अनेकदा अडकतो. अशा वेळी काय करता येईल, हे सांगणारा वाटाड्या म्हणून शिवाजीराव गोर्लेलिखित ‘निर्णय कसा घ्यावा?’ हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल.

निर्णय घेण्यापूर्वीची विचारप्रक्रिया कशी असावी? याची विशेष कल्पना आपल्याला नसते. त्याबाबत अगदी नेमकी आणि सखोल माहिती लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून दिली आहे. ३५ हून अधिक प्रकरणांचा समावेश असणाऱ्या पुस्तकात निर्णय प्रक्रियेच्या जवळपास सर्व बाजूंचा व्यापक परामर्श घेतला गेला आहे. त्याचप्रमाणे केवळ प्रेरणादायी विचारांनी भारावून सोडण्याऐवजी लेखकाने यशाची गॅरंटी नसते, आत्मविश्वास असावा... अति नसावा, फुकट काहीच नसतं यांसारख्या प्रकरणातून वास्तवदर्शी दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेकदा निर्णय घेताना आपल्या बुद्धीला पटलेला मार्ग आणि आपले मन सांगत असलेला मार्ग यांपैकी नेमका कोणता मार्ग निवडावा? याचा निर्णय आपण करू शकत नाही. अशा परिस्थितीत नेमके काय करता येईल? हे लेखकाने ‘लॉजिकल की दिललॉजिकल?’ या प्रकरणात अगदी अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतेही एक टोक न गाठता आपल्याच मन आणि बुद्धीचा समन्वय साधून एखादा निर्णय कसा घेता येईल? याची उदाहरणेदेखील दिली आहेत.

पाश्चात्त्य आणि पौर्वात्य जीवन प्रेरणांचा संगम साधत मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी म्हणून जे जे आवश्यक आहे ते या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला असल्यामुळे ते आपल्याला अधिक जवळचे वाटते. अर्थात असे असले, तरी हे पुस्तक कोणत्याही भौगोलिक सीमांमध्ये अडकलेले मुळीच नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हे पुस्तक आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल.

(संकलन : रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()