Railway Recruitment : दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदांवर भरती सुरू

उत्तर भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
Railway Recruitment 2023
Railway Recruitment 2023esakal
Updated on

Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याची जर तुमची इच्छा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. रेल्वे भरती सेलने (RRC) उत्तर भारतीय रेल्वेमध्ये अ‍ॅपरेंटिस पदांवर भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी rrcpryj.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही १४ डिसेंबर २०२३ आहे. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी १४ डिसेंबरपूर्वी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.

Railway Recruitment 2023
HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

किती पदांवर केली जाणार भरती?

या भरती अंतर्गत एकूण १६६४ पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये एकूण ३६४ पदे भरली जाणार असून त्यापैकी १४९ पदे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आली आहेत. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये एकूण ३३९ पदांवर भरती करण्यात येणार आहे.

झाशी विभागामध्ये जवळपास ५२८ पदांवर भरती केली जाणार असून त्यात २३१ पदे सर्वसाधारण श्रेणीसाठी आहेत तर  आग्रा विभागात २९६ पदांवर भरती केली जाणार आहे. २९६ पदांपैकी १३९ पदे सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत शिकाऊ इलेक्ट्रिशिअन, फिटर, पेंटर, स्टेनोग्राफर, मेकॅनिक, सुतार इत्यादी पदांची भरती करण्यात येणार आहे.

उमेदवाराची पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50% गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये ITI डिप्लोमा होल्डर असणे गरजेचे आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे निश्चित करण्यात आले असून कमाल वय हे २४ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

शिवाय, या पदांसाठी इच्छुक असलेल्या आणि अर्ज करणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Railway Recruitment 2023
Railway Recruitment : कोकण रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()