आता ‘आरआयएमसी परीक्षे’साठी मुलींनाही करता येणार अर्ज

आरआयएमसी
आरआयएमसीsakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा’ (आरआयएमसी परीक्षा) ही आतापर्यंत फक्त मुलांसाठीच होती. परंतु सर्व्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आता ही परीक्षा मुलींना सुद्धा देता येणार आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिंनींना १५ नोव्हेंबरपर्यंत  प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

आरआयएमसी
राज्याचा मोठा निर्णय; आमदारांना मिळणाऱ्या विकासनिधीमध्ये वाढ

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड)’ येथे फक्त इयत्ता आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा असून ही परीक्षा १८ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेअंतर्गत लेखी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा दिनांक मौखिक परीक्षेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहे, असेही सुपे यांनी स्पष्ट केले आहे.

‘आरआयएमसी परीक्षे’चे वेळापत्रक :

  • परीक्षेची तारीख : १८ डिसेंबर २०२१

  • विषय : वेळ : गुण

  • गणित : सकाळी ९.३० ते ११ : २००

  • सामान्य ज्ञान : दुपारी १२ ते १ :७५

  • इंग्रजी : दुपारी २.३० ते ४.३० : १२५

प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे :

  • जन्म दाखल्याची छायाप्रत

  • अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत

  • अधिवास प्रमाणपत्र

  • शाळेच्या बोनाफाईड सर्टीफिकेटची मुळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक

  • आधारकार्डची छायाप्रत

*अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.mscepune.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.