Jobs : ऑक्टोबर महिन्यात नोकऱ्यांचे प्रमाण घटले

ऑक्टोबरमध्ये सामाजिक सुरक्षितता देणाऱ्या तीन योजनांमधील सदस्यसंख्याही रोडावली आहे. यावरून रोजगार बाजारपेठेवर दबाव असल्याचे दिसून येत आहे.
Jobs
Jobsesakal
Updated on

मुंबई - देशात ऑक्टोबर महिन्यांत औपचारिक नोकऱ्यांमध्ये मोठी घट झाल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्य संख्येच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात ‘ईपीएफओ’कडे सात लाख ७२ हजार ८४ नव्या सदस्यांची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये ही संख्या नऊ लाख २६ हजार ९३४ होती.

ऑक्टोबरमध्ये सामाजिक सुरक्षितता देणाऱ्या तीन योजनांमधील सदस्यसंख्याही रोडावली आहे. यावरून रोजगार बाजारपेठेवर दबाव असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यात नोकऱ्यांमध्ये झालेली घट ही सलग तिसऱ्या महिन्यातील घट झाली आहे.

कमी पगाराच्या नोकऱ्या आणि दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात असलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडील (ईएसआयसी) नव्या सदस्यांची संख्याही ऑक्टोबरमध्ये १३ लाखांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांतील ही सर्वांत कमी पातळी आहे.

सप्टेंबर २०२३ च्या तुलनेत मासिक आधारावर ‘ईपीएफओ’मध्ये नव्या सदस्यांच्या संख्येत १६.७ टक्के घट झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत नव्या ‘ईपीएफओ’ सदस्यांच्या संख्येत ६.०७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. नव्याने सामील झालेल्या सदस्यांपैकी ५८ टक्के कर्मचाऱ्यांचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान आहे. नव्या नोकऱ्या मिळवणाऱ्यांपैकी बहुतांश तरुण आहेत.

कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय पेन्शन योजनेतील (एनपीएस) सदस्यांमध्येही सप्टेंबरमधील ७३,३१८ सदस्यांच्या तुलनेत ३.२ टक्के घसरण झाली असून, ऑक्टोबरमध्ये ही संख्या ७०,९४७ झाली आहे. गेल्या चार महिन्यांतील हा नीचांकी स्तर आहे. या कालावधीत एकूण ११.१ लाख लोकांनी नोकऱ्या बदलल्या आहेत. गेल्या चार महिन्यांत देशातील नोकऱ्या सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.