नर्सरी शुल्क २५ ते ८५ हजारांवर

दरवेळी केवळ अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, त्याचबरोबरच शाळांकडून होणाऱ्या शुल्क वाढीबाबत बोलले जाते.
Nursery Student
Nursery Studentsakal
Updated on
Summary

दरवेळी केवळ अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, त्याचबरोबरच शाळांकडून होणाऱ्या शुल्क वाढीबाबत बोलले जाते.

पुणे - पूर्व प्राथमिक शाळा ऑफलाइन (School Offline) सुरू करण्याला परवानगी मिळाल्याने खासगी कंपनीत नोकरदार असणारी हर्षदा चौधरी (नाव बदलले आहे) यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीला (Daughter) आता नर्सरी शाळेत (Nursery School) पाठविण्याचा निर्णय घेतला आणि तिचा मुलीसाठी शाळा निवडण्याचा शोध सुरू झाला. ‘एकामागून एक शाळा शोधत असताना प्ले ग्रुप, नर्सरीसाठी तब्बल ४० ते ८५ हजार रुपये वार्षिक शुल्क (Annual Fee) भरावे लागणार आहे. शिवाय हे शुल्क प्रत्येक वर्षी म्हणजे विद्यार्थी (Students) पुढच्या वर्गात जाईल, तसे हे शुल्क वाढत जाणार आहे. त्यामुळे आपल्या मुलीसाठी योग्य शाळा निवडताना तसेच त्यासाठी आर्थिक जमवाजमव करताना प्रचंड तडजोड करावी लागत आहे,’ असा अनुभव हर्षदा यांनी सांगितला.

दरवेळी केवळ अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, त्याचबरोबरच शाळांकडून होणाऱ्या शुल्क वाढीबाबत बोलले जाते. परंतु मुळातच विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश होत असताना म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षणाची पायरी चढताना असणारे शुल्क हे लाखांच्या घरात पोचणारे आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर आर्थिक जुळवाजुळव करताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाल्याच्या शाळा प्रवेशाबाबत पालक प्रचंड उत्सुक असतात, परंतु शाळेचा शोध सुरू होतो, या उत्साहाची जागा आर्थिक गणित जुळविण्यात जाते.

Nursery Student
आयकर विभागात सरकारी नोकरीची संधी; 'या' जागांसाठी होणार भरती

किरण गाढवे म्हणाल्या,‘‘माझी मुलगी आता माध्यमिक शिक्षण घेत आहे. तर मुलगा पूर्व प्राथमिक शिक्षणास पात्र आहे. मुलीला नर्सरीला टाकले, त्यावेळी (म्हणजेच साधारणतः सात-आठ वर्षांपूर्वी) साधारणतः १५ ते २० हजार रुपये शुल्क होते. परंतु आता मुलाला नर्सरीला प्रवेश घेत असतानाच हेच शुल्क ४५ ते ५० हजार रुपयांवर पोचले आहे. मुलांचे किमान पदवी शिक्षण होईपर्यंत त्यादृष्टीने आर्थिक नियोजन पालक करत असतात. परंतु आता तर पूर्व प्राथमिक शिक्षणाचेच शुल्क गगनाला भिडल्यामुळे पालकांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.’’

शहरातील अद्यापही बहुतांश पूर्व प्राथमिक शाळा या प्राथमिक शाळांना जोडून आहेत. त्यामुळे पालकांना प्राथमिक शिक्षणासाठी पुन्हा वेगळ्याने शाळेचा शोध करावा लागत नसल्याची हमी मिळते. त्यामुळे पालक अशा शाळांमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य देतात. परंतु या शाळांच्या शुल्काने ४० ते ५० हजार रुपयांपुढील टप्पा गाठला आहे. उर्वरित आकर्षक नावे असणाऱ्या खासगी नर्सरी शाळा आपण केंब्रिज पॅटर्न, सीबीएसई, आयसीएसई शाळांचा शिक्षण पद्धती ‘फॉलो’ करत असल्याचे सांगत पालकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पूर्व प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांनी लिहायला, वाचायला शिकावे, असे बिलकूल अभिप्रेत नाही; तर मुलांना एकमेकांबरोबर राहायला शिकविणारे, सामाजिक जाण निर्माण करणारे हे शिक्षण असावे. परंतु, आजकाल वेगवेगळ्या प्रकारे पालकांना भुरळ पाडून अनेक खासगी संस्था दिशाभूल करत आहेत. मुळात पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी स्वतंत्र धोरण असणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने यापूर्वी यावर कामदेखील केले आहे. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने पूर्व प्राथमिक शिक्षणात शाळांकडून पालकांची आर्थिक आणि पर्यायाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी होत आहे.

- डॉ. वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त शिक्षण संचालक

Nursery Student
AIIMS Recruitment 2022: AIIMS मध्ये प्राध्यपक पदांसाठी सरकारी नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

पूर्व प्राथमिक शाळांची सर्वसाधारण शुल्करचना

  • वार्षिक शुल्क : साधारणतः २५,००० ते ८५,०००

  • टप्प्या-टप्प्याने शुल्क भरण्याची हमी दिल्यास, शुल्कात १० ते २० टक्क्यांनी होतेय वाढ

  • शैक्षणिक साहित्य, गणवेश, दप्तर यांचा शुल्कात समावेश

  • शाळेची वेळ : दोन ते तीन तास

पूर्व प्राथमिक शिक्षण असे हवे

  • शिक्षण, शाळेची गोडी लावणारे

  • कृती, खेळातून अभ्यासाची आवड निर्माण करणारे

  • दैनंदिन चांगल्या सवयी लावणारे

  • अक्षर, अंक, रंग, आकार ओळख

  • सर्वांगीण विकासास मदत करणारे

  • भाषेची गोडी लावणारे

परिसरानुरूप शुल्कात बदल

  • ६० ते ८० हजार - मध्यवर्ती पेठांमधील शाळा

  • ३० ते ६० हजार - उर्वरित पेठांमधील शाळा (मध्यवर्ती भाग सोडून)

  • २५ ते ४० हजार - उपनगरांमधील शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.