चांगल्या संधीच्या शोधात असलेल्या आणि लॅब-तंत्रज्ञांच्या सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही आहे आनंदाची बातमी.
सोलापूर : चांगल्या संधीच्या शोधात असलेल्या आणि लॅब-तंत्रज्ञांच्या सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही आहे आनंदाची बातमी. ओडिशा सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत विविध जिल्हा रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये एक हजार लॅब टेक्निशियन (Lab Technician) पदांच्या भरतीसाठी ओडिशा अधीनस्थ कर्मचारी निवड आयोगाने (OSSAC) जाहिरात जारी केली आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या लॅब टेक्निशियन रिक्रुटमेंट (Recruitment) 2021 च्या जाहिरातीनुसार, या पदांची जिल्हा संवर्गात भरती करायची आहे. तसेच, विहित निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली जाईल.
अर्ज कुठे आणि कसा कराल?
जिल्हा संवर्गातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत लॅब टेक्निशियनच्या 1000 पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ओडिशा अधीनस्थ कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत osssc.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल जिथे ऑनलाइन अर्जाची लिंक सक्रिय केली गेली आहे. गेले अर्ज करण्याची लिंक OSSC द्वारे 1 डिसेंबर 2021 रोजी सक्रिय केली जाईल आणि उमेदवार विहित अर्ज प्रक्रियेनुसार 21 डिसेंबर 2021 पर्यंत नोंदणी करू शकतील. तथापि, यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 25 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ असेल.
तथापि, ओडिशा सबऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन (OSSAC) ने 1000 लॅब टेक्निशियनच्या भरतीसाठी जारी केलेल्या जाहिरातीमध्ये पात्रता, जिल्हावार रिक्त पदांची संख्या, वेतनश्रेणी, वयोमर्यादा आदी तपशील दिलेला नाही. हे सर्व तपशील आयोगाकडून सविस्तर अधिसूचनेद्वारे लवकरच जाहीर केले जातील. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अपडेट चेक करावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.