भारतीय सैन्यात अधिकारी पदांची भरती ! पगार दोन लाखांपर्यंत

भारतीय सैन्यात अधिकारी पदांची भरती ! पगार दोन लाखांपर्यंत
Indian Army
Indian ArmyMedia Gallery
Updated on
Summary

भारतीय सैन्यात अधिकारी पदांसाठी लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

सोलापूर : भारतीय लष्कराने (Indian Army) नॉन डिपार्टमेंटल ऑफिसर (Non Departmental Officer) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार रिक्त पदांसाठी भारतीय प्रादेशिक सैन्याच्या अधिकृत वेबसाइट jointerritorialarmy.gov.in वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2021 आहे.

Indian Army
'एमपीएससी'तर्फे मेगाभरती ! आयोगाच्या सदस्यांची नावे अंतिम

या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्‍यक आहे. नॉन डिपार्टमेंटर ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 42 वर्षांच्या दरम्यान असावी. अधिकारी पदासाठी लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षा 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येईल. या पदांसाठी निवडक उमेदवारांना 7 व्या सीपीसीनुसार वेतन दिले जाईल. ब्रिगेडियर पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 1 लाख 39 हजार 600 ते 2 लाख 17 हजार 600 रुपये वेतनश्रेणी दिली जाईल.

Indian Army
केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसू शकतो ऑगस्टमध्ये धक्का !

प्रत्येक पेपरसाठी जास्तीत जास्त वेळ दोन तास असेल आणि पेपर दोन सत्रांमध्ये घेण्यात येतील. ही एक वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा असेल आणि उमेदवारांना परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी पेपरच्या प्रत्येक भागामध्ये किमान 40 टक्के गुण आणि एकूण 50 टक्के गुण मिळवावे लागतील. केवळ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.