OIL Recruitment 2021 : ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये (OIL) भरतीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांकरिता ही महत्वाची बातमी! भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक असलेल्या ऑईल इंडिया लिमिटेडने (OIL) दुलियाजान (आसाम) येथील फील्ड हेडक्वार्टरमध्ये कंत्राटी तत्त्वावर 115 वेगवेगळ्या पदांवरील भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केलीय. कंपनीने आज जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, 28 जुलै 2021 रोजी कंत्राटी सहाय्यक मेकॅनिक, ड्रिलिंग, रिग्मन, केमिकल असिस्टंट, असिस्टंट रिग इलेक्ट्रिशियन, गॅस लॉगर, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, असिस्टंट डिझेल मेकॅनिक, असिस्टंट फिटर आणि असिस्टंट या पदांवर भरती होणार असून वॉक-इन-इंटरव्ह्यू 16 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (OIL Recruitment 2021 Recruitment For 115 Posts In Oil India Limited bam92)
ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये (OIL) भरतीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांकरिता ही महत्वाची बातमी आहे!
इच्छुक उमेदवार ओआयएलच्या अधिकृत वेबसाइटवर oil-india.com याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. या पदांचा अर्ज भरत असताना उमेदवाराने विशेष काळजी घ्यावी, की मूळ कागदपत्रांसह प्रत्येकाची एक प्रत भरून, आपल्याला खालील पत्त्यावर पोस्टनुसार निर्धारित तारखेला उपस्थित रहावे लागेल. कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑईल इंडिया लिमिटेड, दूलियाजान या पत्यावर उमेदवारांनी सकाळी 7 ते 11 यावेळेत अर्ज भरावा.
अशी आहेत रिक्त पदे..
कंत्राटी सहाय्यक मेकॅनिक - आयसीई - 31 पदे
कंत्राटी ड्रिलिंग रिग्मन - 26 पदे
कंत्राटी सहाय्यक मेकॅनिक - पंप - 17 पदे
कंत्राटी रसायन सहाय्यक - 10 पदे
कंत्राटी सहाय्यक रिग इलेक्ट्रीशियन - 10 पदे
कंत्राटी गॅस लॉगर - 8 पदे
कंत्राटी विद्युत पर्यवेक्षक - 5 पदे
कंत्राटी सहाय्यक डिझेल मेकॅनिक - 5 पदे
कंत्राटी सहाय्यक फिटर - 2 पदे
कंत्राटी सहाय्यक वेल्डर - 1 पदे
OIL Recruitment 2021 Recruitment For 115 Posts In Oil India Limited bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.