Government job : ONGCमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; पगार ६० हजार

या भरतीद्वारे एकूण ८७१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Government job
Government jobgoogle
Updated on

मुंबई : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) लिमिटेडने सहाय्यक कार्यकारी अभियंता, केमिस्ट यांसारख्या अनेक पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण ८७१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

GATE 2022 मधील यशस्वी उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.ongc.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२२ आहे. (ONGC Graduate Trainee Vacancy 2022)

Government job
UPSC recruitment : पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची संधी

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - 871

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 22 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ ऑक्टोबर २०२२

वय मर्यादा

या पदांसाठी फक्त 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BE, BTech, ME, MTech, MSc पदवी सिव्हिल/मेकॅनिकल इत्यादी असणे आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र पात्रता विहित करण्यात आली आहे.

Government job
Indian Navy Recruitment 2022 : नौदलात मुलाखतीविना १०वी उत्तीर्णांची भरती

पगार

या पदांवर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना 60,000 ते 1,80,000 रुपये पगार दिला जाईल.

अर्ज फी

सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 300 रुपये भरावे लागतील. तर, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड कागदपत्रं पडताळणीद्वारे केली जाईल.

कुठे अर्ज करायचा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना recruitment.ongc.co.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()