कोरोना गेल्यानंतरही ही शिक्षण प्रणाली सुरूच ठेवणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.'
म्हाकवे : ऑनलाइन शाळा देशातील पहिली अत्याधुनिक शिक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली राज्यभर राबविणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी केले. (online education) बानगे (ता. कागल) येथील केंद्रीय शाळेत ऑनलाइन शाळा व्हर्च्युअल अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर होते. अहमदनगरच्या दिप फाऊंडेशनचे तंत्रस्नेही शिक्षक संदिप गुंड यांनी ही प्रणाली विकसित केली आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'गरज ही शोधाची जननी असते. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अंधकारमय ढग निर्माण झाले. परंतु आता ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे प्राथमिक शिक्षण सर्वात पुढे असेल. वाड्यावस्त्यावरही हे शिक्षण पोहचवण्यासाठी सोलर किटची (for education use solar kit) निर्मिती केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून १ लाख ६८ हजार विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. महत्वकांक्षी प्रणाली संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येईल, अत्यंत प्रभावी असल्याने कोरोना गेल्यानंतरही ही शिक्षण प्रणाली सुरूच ठेवणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.'
ऑनलाइन शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल करून प्राथमिक शाळेतील मुलांनाही या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे अहमदनगरचे तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांचा सन्मान करण्यात आला. तसेच इंटरनेट व वीज नसतानाही सौरऊर्जेवर चालणारे नाविन्यपूर्ण सोलर किट गुंड यांनी विकसित केले आहे. हे किट बोळावीवाडी येथील प्राथमिक शाळेला देण्यात आले.
प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर यांनी केले. वसंत जाधव, रमेश सावंत यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, उपसभापती मनिषा सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, रविंद्र पाटील, जयदीप पोवार, सरपंच वंदना सावंत, जी. एस. पाटील, राहूल पाटील, दत्ता सावंत, विकास सावंत आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. गजानन गुंडाळे यांनी आभार मानले
वारसा राजर्षी शाहूंच्या शिक्षणव्यवस्थेचा
बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी १०० वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. त्यानंतर आता कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत प्राथमिक शाळेत शिकणारी गरीबांची मुले शिक्षणात मागे राहू नयेत. यासाठी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची सातत्याने धडपड सुरू होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आज या ऑनलाइन प्रकल्पाला मूर्त स्वरूप आले आहे. मुश्रीफ हे छत्रपती शाहूंचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा जपणारे आणि दुरदृष्टी असणारे राजकर्ते आहेत, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काढले.
विद्यार्थी व शिक्षक केंद्रित प्रणाली
ऑनलाईन शाळा अध्ययनातील पोकळी भरून काढणारी प्रणाली आहे. एकाच विद्यार्थ्यांला २२ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. अध्ययान, अध्यापन व मुल्यमापन करता येणारी विद्यार्थी व शिक्षक केंद्रित सहज शिकता येणारी प्रणाली आहे. यामुळे मुलांचा शिक्षणाकडे ओढा वाढणार असल्याचे दिप फाऊंडेशनचे संदीप गुंड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.