Handwriting: सद्यस्थितीत सर्वत्र ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा बोलवाला आहे. कोरोना (कोविड) काळात सलग तीन वर्षे शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ऑनलाईन पध्दतीने सुरू होते. या पद्धतीमुळेच विद्यार्थ्यांचा हस्त लेखनाचा सराव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
परिणामी दहावी, बारावी तसेच माध्यमिक विद्यार्थ्यांना परीक्षा देताना वा लेखी पेपर सोडवताना हस्ताक्षराची समस्या निर्माण झाली आहे. यासाठी दररोज लिखाणाचा सराव करणे आवश्यक आहे. लिखाणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. सर्वच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविला गेला. घरात बसूनच विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासक्रम करू लागले.
पेपर लिहितांना वेळ पडतो अपुरा
विद्यार्थ्यांना हस्तलेखनाचा सराव दैनंदिन असतो. मात्र, या सुवाच्च, वळणदार हस्तलेखनापासून विद्यार्थी दुरावले आहेत. लिखाणाचा सराव घडल्याने विद्यार्थ्यांच्या यांचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे हस्तलेखनाची सवय मोडली असून लिहिताना वेळही अपुरा पडत आहे.
विद्यार्थ्यांच्या वैचारिक शक्तीवर परिणाम
अजूनही काही विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाइन सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांचीही वैचारिक शक्ती कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने स्मार्टफोन, लॅपटॉप व संगणक याद्वारे शालेय अभ्यासक्रम करून अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नियमितपणे असलेला हस्तलेखनाचा सराव अचानकपणे बंद पडला.
अलीकडे ऑनलाइन शिक्षणाला विशेष प्राप्त झाले आहे. सर्वच इयत्तांमध्ये हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लिहिण्याचा सराव सवय कमी होत चालला आहे. परिणामी परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. जरी ऑनलाइन शिक्षण असले तरी विद्यार्थ्यांनी लिहिण्याची सवय कायम ठेवणे नितांत गरजेचे आहे. जेणेकरून लिहिण्याची सवय राहिल्यास परीक्षेत पेपर सोडविण्यास यांना कोणताही त्रास होणार नाही.
-सुनिल कोल्हे, मुख्याध्यापक, स्व.नंदकिशोर जयस्वाल विद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.