‘अ’ ऑनलाइनचा : सारांश लेखनातून अभ्यास

माहिती साठवण केवळ स्मरणशक्तीवर अवलंबून असते, तेव्हा ते अर्थहीन असते, यांत्रिक असते.
‘अ’ ऑनलाइनचा : सारांश लेखनातून अभ्यास
‘अ’ ऑनलाइनचा : सारांश लेखनातून अभ्यासsakal media
Updated on

-डॉ. उमेश दे. प्रधान

माहिती साठवण केवळ स्मरणशक्तीवर अवलंबून असते, तेव्हा ते अर्थहीन असते, यांत्रिक असते. वेळप्रसंगी दगा देणारेही असते. तरसुद्धा माहिती डोक्यात भरणे, हा अभ्यासाचा एक अविभाज्य भागच बनतो. यासाठीच एक तंत्र म्हणजे माहितीचे संक्षिप्तीकरण करणे. अभ्यास करायचा म्हणजे काय करायचे, तर संक्षिप्तीकरण कौशल्य आत्मसात करून घ्यायचे.

यासाठी प्रथम संक्षिप्तीकरण म्हणजे काय, हे जाणून घेणे आवश्यक आहे. संक्षिप्तीकरण याचा अर्थ खरेतर सारांश लेखन असाच आहे. मोठ्या प्रमाणात असणारी माहिती थोडक्यात, मुद्देसुदपणे मांडता येणे इथे अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकरणात जी माहिती देण्यात आलेली आहे, ती कमीत कमी शब्दांत मांडण्याचे हे कौशल्य आहे. प्रत्येक प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी वेगळ्या काढून एकत्रितपणे मांडणे गरजेचे असते.

संक्षिप्तीकरण करताना काय निवडायचे आणि काय टाळायचे हे समजणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती काय आहे, मुद्दा कोणता आहे, नक्की काय सांगायचे आहे आणि ते सांगण्याकरीता काय स्पष्टीकरणे दिली आहेत, उदाहरणे, तुलनात्मक वाक्ये आणि भाषिक फुलोरा कोठे आला आहे हा फरक ओळखता आला पाहिजे. काय अत्यंत महत्त्वाचे आणि काय त्या मुद्द्याला बळकटी देणारे, हे वेगवेगळे करता यायला हवे. प्रमुख मुद्द्यांपासून दुय्यम आणि कमी महत्त्वाचे असे मुद्दे वेगळे करता यायला हवेत. अनेक वेळा लेखक आपले म्हणणे पटवून देण्यासाठी आपले विचार विविध भाषा उपयोगाच्या स्वरूपात, पुनरावृत्ती करत, अलंकारिक भाषा वापरत आणि एका शब्दासाठी अनेक शब्द वापरत आपले विचार पटवून देत असतात. अर्थात, विचाराचा मुद्दा बाजूला ठेवून नको त्या गोष्टीच बाहेर येत असतात. म्हणून आवश्यक आहे ते संक्षिप्तीकरणाचे कौशल्य. वाचता वाचता कळायला हवे की कोणती वस्तुस्थिती सांगितली आहे, उदाहरणे काय आहेत, स्पष्टीकरण काय आहे आणि अवांतर माहिती काय आहे. हे कळले तर अभ्यास पटकन होणार.

माहितीच्या संक्षिप्तीकरणाची अभ्यास करताना काय गरज आहे, हे समजून घ्यायला हवे. माहितीवर आधारित जाड पुस्तके आणि प्रकरणे वाचत बसण्यात जास्त वेळ जातो, अधिकची माहिती वाचायचे राहून जाते. अभ्यासाचा वेळ वाचवणे या संक्षिप्तीकरणामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे आपली शक्ती नाहक खर्चीही होणार नाही. एखादे प्रकरण परत परत वाचायचे असल्यास सगळे प्रकरण वाचण्यापेक्षा केवळ संक्षिप्तीकरणावर नजर फिरवल्यास संपूर्ण प्रकरण लक्षात ठेवायला मदतच होईल. अभ्यासाचा वेळ तर वाचेलच, शिवाय जास्तीचा अभ्यासपण शक्य होईल. जिथे काही मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, तिथे हे कौशल्य नक्कीच फायद्याचे ठरते.

एकतर तयार सारांशापेक्षा स्वतःहून केलेला अभ्यास नेहमीच महत्त्वाचा असतो. संक्षिप्तीकरणाची पद्धती येथे संपूर्ण प्रकरणातील माहिती ही मुद्द्यांच्या रूपात जरुरी भासल्यास आणि शक्य असल्यास संकेत चिन्हाचा वापर करून मथितार्थ स्वरूपात मांडणे अपेक्षित आहे. हवे नको ते निवडा. प्राप्त मुद्दे नीट लिहून काढा. बघा तुमचा सारांश तयार. हे करत असताना अनेक अंगाने प्रत्येक प्रकरणाचे संपूर्ण वाचन, छाननी आणि अभ्यास होणार आहे. वाचताना हे संक्षिप्तीकरण नुसते चाळत बसले तरी त्या प्रकरणाची, संकल्पनेची वारंवार आवरणे होतील. मग उत्तर लेखन करत असताना त्या प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण करणे एकदम सोपे जाईल. अभ्यास म्हणजे वेगळं काय असतं तर समज आणि आकलन. एकदा ते जमायला लागले, की मग अभ्यास झालाच म्हणून समजा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()