दहावीनंतर फक्त खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांचा पर्याय

यंदापासून राज्यातील ५३ शासकीय संस्थांमधील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद झाले आहेत.
10th Students
10th Studentssakal
Updated on

पुणे : कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रमाचा गवगवा होत असताना राज्यात शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेश बंद झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता दहावीनंतरच्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी केवळ खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांचा पर्याय निवडावा लागत आहे.

10th Students
परदेशात शिक्षण घेणं झालं सोप्प; SBI देतंय कमी दरात कर्ज

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळत होते, परंतु हे अनुदान १९९७-९८ पासून बंद करण्यात आले. केंद्र सरकारचे अनुदान बंद झाल्यानंतर शासकीय संस्थांमधील अभ्यासक्रम कसा राबवायचा, असा प्रश्न राज्य सरकारसमोर होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली मार्च २०२०मध्ये रुपांतरण समिती स्थापन केली होती.

10th Students
पुस्तकाविनाच भरतेय शाळा, शिकवायचं कसं?

या समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वीच शासकीय संस्थांमधील हा अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) रूपांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने ४ फेब्रुवारी २०२१ रोजी (अध्यादेश) निर्णय घेतला. दरम्यान २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय संस्थांमधील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देऊ नयेत, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार यंदापासून राज्यातील ५३ शासकीय संस्थांमधील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद झाले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यंदा केवळ खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशाच्या संधी उपलब्ध आहेत.

10th Students
न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती

‘‘राज्य सरकारने शासकीय संस्थांमधील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम आयटीआयमध्ये रूपांतरित करण्यासाठी नेमलेल्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी डिसेंबर २०२१पर्यंतची मुदत दिली आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या सक्षमीकरणावरच समितीचा भर असणार आहे.’’

- विक्रम काळे, आमदार आणि अध्यक्ष, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम रुपांतरण समिती,

"उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम हा रोजगार आणि स्वयं रोजगारावर आधारित आहे. त्यामुळे खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा ओढा कायम आहे. दरम्यान नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसाय अभ्यासक्रम अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, म्हणून सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.’’

- जयंत भाभे, अध्यक्ष, व्होकेशनल टीचर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.