संधी करिअरच्या...: विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण

काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनीही यासाठी पुढे येऊन विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याची क्रांतिकारी संकल्पना राबवली आहे
संधी करिअरच्या...: विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण
संधी करिअरच्या...: विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षणsakal media
Updated on

जागतिकीकरणाच्या रेट्यात संघटित क्षेत्रांत, तसेच शासनामध्ये नोकरीच्या फार मोठ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाही, हे लक्षात घेता बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नावर ‘स्वयंरोजगार’ हा एकमेव प्रभावी उपाय आहे यात शंका नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था यासाठी विविध पातळ्यांवर तरुणांना कौशल्य शिकवून स्वयंरोजगारासाठी उद्युक्त करत आहेत. काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनीही यासाठी पुढे येऊन विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याची क्रांतिकारी संकल्पना राबवली आहे. पुणे जिल्ह्यातील रुडसेट इन्स्टिट्यूट या संस्थेची माहिती आपण गेल्या लेखात पाहिली. या लेखात महाबॅंक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व बरोडा स्वयंरोजगार विकास संस्था या दोन संस्थांची माहिती घेऊ यात.

महाबॅंक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था

बॅंक ऑफ महाराष्ट्रने डिसेंबर २००१मध्ये ही स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था सुरू केली. १८ ते ४५ वयोगटातील दहावी पास/नापास युवक/युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण येथे दिले जाते. हे संपूर्ण प्रशिक्षण गुरुकुल पद्धतीने दिले जात असल्याने प्रशिक्षणार्थींनी कोर्सचा कालावधी संपेपर्यंत संस्थेतच राहणे आवश्यक असते. हे संपूर्ण प्रशिक्षण, प्रशिक्षणाचे साहित्य, निवास व भोजन या सर्व गोष्टी संपूर्णपणे विनामूल्य आहेत. येथे एक ते चार आठवड्यांचे विविध‌ कोर्सेस चालवले जातात, ज्यात कुक्कुटपालन, शेळीपालन, दुचाकी वाहन दुरुस्ती, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, टेलरिंग, ब्युटी पार्लर, मोबाईल दुरुस्ती, पेपर बॅग मेकिंग, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, इलेक्ट्रिक मोटार रिवाईंडिंग, बिल्डिंग पेंटिंग, विद्युत उपकरण दुरुस्ती अशा तीस अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रत्येक बॅचमधे २५ ते ३० प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जातो. फक्त तांत्रिक शिक्षणच नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे अष्टपैलुत्व यावे लागते, त्या सर्व गोष्टींची प्रशिक्षणार्थींना शिकवण दिली जाते. आजवर नऊ हजार विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले असून, त्यातील सत्तर टक्क्यांहून अधिक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. अशा प्रकारच्या उपक्रमांची समाजाला असलेली आत्यंतिक गरज व वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन संस्थेने पुण्यापाठोपाठ नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, जालना, ठाणे येथेही केंद्रे सुरू केली आहेत.

संपर्कासाठी संस्थेचा पत्ता पुढीलप्रमाणे :

महाबॅंक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सर्व्हे नंबर ७ अ/२, हडपसर इंडस्ट्रिअल इस्टेट, पुणे-४११०१३. दूरध्वनी : ०२०-२६८२१५१४/७५८८५६५७४१

बरोडा स्वयंरोजगार विकास संस्था

बॅंक ऑफ बडोदाने जानेवारी २००५मध्ये ही स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था सुरू केली. १८ ते ४५ वयोगटातील दहावी पास / नापास युवक/ युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण येथे दिले जाते. हे संपूर्ण प्रशिक्षण गुरुकुल पद्धतीने दिले जात असल्याने प्रशिक्षणार्थींनी कोर्सचा कालावधी संपेपर्यंत संस्थेतच राहणे आवश्यक असते. हे संपूर्ण प्रशिक्षण, प्रशिक्षणाचे साहित्य, निवास व भोजन या सर्व गोष्टी संपूर्णपणे विनामूल्य आहेत. एक ते चार आठवड्यांचे विविध‌ कोर्सेस चालवले जातात ज्यात कुक्कुटपालन, शेळीपालन, फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग, टेलरिंग, ब्युटी पार्लर, मोबाईल दुरुस्ती, पेपर बॅग मेकिंग, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, मेन्स पार्लर, अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रत्येक बॅचमधे २५ ते ३० प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जातो. फक्त तांत्रिक शिक्षणच नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे अष्टपैलुत्व यावे लागते त्या सर्व गोष्टींची प्रशिक्षणार्थींना शिकवण दिली जाते. आजवर सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले असून, त्यातील सत्तर टक्के हून अधिक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. प्रशिक्षणानंतर दोन वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेतला जातो.

संपर्कासाठी संस्थेचा पत्ता पुढीलप्रमाणे :

बरोडा स्वयंरोजगार विकास संस्थान, थेऊर फाटा, पुणे- सोलापूर रस्ता, कुंजीर वाडी, पुणे-४१२२०१. दूरध्वनी : ०२०- २६९१२००७/९७६९१४३४३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.