- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ
‘केमिस्ट्री’ या शास्त्र शाखेतील विषयातून त्याचे उपयोजित तंत्रज्ञान तयार झाले ते म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग. आज अनेक ठिकाणी केमिकलच्या साहाय्याने वस्तू निर्माण किंवा रासायनिक प्रक्रिया पार पडताना दिसतात. रंग, केमिकल्स, सौंदर्यप्रसाधने, शाई, रंगीत द्रव्ये, शेती विषयातील कामकाजाच्या बाबी, पॅकेजिंग मटेरियल, औषधे, खते, प्लास्टिक, इंधने, इमारतीचे सामान, फर्निचर, पिशव्या, घरातील वस्तू अशा सर्वच आघाड्यांवर केमिकल इंजिनिअरिंग कार्यरत असलेले दिसत आहे. त्यासाठीचे शिक्षण आहे बीई किंवा बीटेक केमिकल इंजिनिअरिंग.