नवी दिल्ली : कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेत आता सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी मंगळवारी याची घोषणा केली. यामुळं राज्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, बोर्डाच्या परीक्षांचं महत्व आबाधित राहिल, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Opportunity for students of all boards in CUET announcement of UGC Chairman)
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जगदेश कुमार म्हणाले, "राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही आणि परीक्षेमुळे सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांना समान खेळाचे क्षेत्र देखील मिळेल. ग्रामीण पार्श्वभूमीचे विद्यार्थी प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देणारे, विविध आर्थिक पार्श्वभूमीतून आलेले आणि भौगोलिकदृष्ट्या देशभरात वितरीत झालेले विद्यार्थी या सर्वांना सर्व समान वागणूक दिली जाईल. कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेत कोचिंग कल्चरला आम्ही धक्का देणार नाही. आता पुढील सत्रापासून वर्षातून दोनदा CUET आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. प्रवेश परीक्षा केवळ केंद्रीय विद्यापीठांपुरती मर्यादित नसून खाजगी विद्यापीठांमध्येही असेल. अनेक प्रमुख खाजगी विद्यापीठांनी असे संकेत दिले आहेत. त्यांना बोर्डात येऊन CUET द्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला आवडेल,” असंही जगदेश कुमार यांनी सांगितंल.
दरम्यान, कुमार यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलं होतं की, CUET गुणे आणि इयत्ता 12 वीचे गुण 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असेल आणि केंद्रीय विद्यापीठे त्यांचे किमान पात्रता निकष निश्चित करू शकतात. या परीक्षेमुळं पदवीपूर्व प्रवेशासाठी 'कोचिंग कल्चर' निर्माण होईल का? या प्रश्नावर कुमार म्हणाले, परीक्षेला कोणत्याही कोचिंगची आवश्यकता नसते त्यामुळं कोचिंग संस्कृतीला धक्का देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही परीक्षा पूर्णपणे १२वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. पण या परीक्षेत इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमातील प्रश्नही असतील की नाही याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. याचं उत्तरही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
TISS आणि जामिया विद्यापीठांनाही मिळणार प्रवेश
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) आणि जामिया हमदर्द या आठ डीम्ड-टू-बी विद्यापीठांनी देखील विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CUET चे गुण वापरण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही जगदेश कुमार यांनी सांगितलं आहे. मी काल या आठच्या कुलगुरू आणि संचालकांसह एक बैठक घेतली, असंही ते यावेळी म्हणाले.
बोर्डाच्या परीक्षांचंही महत्व आबाधित राहणार
विद्यापीठे अजूनही पात्रता निकष म्हणून बोर्ड परीक्षांचा वापर करतील. काही विद्यापीठे 60 टक्के आवश्यकता कोटा निर्माण करू शकतात, काही आवश्यकतेनुसार 70 टक्के सेट करणे निवडू शकतात. त्यामुळे बोर्ड परीक्षा अप्रासंगिक बनविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तथापि, १०० टक्के गुण मिळवण्यावर लक्ष केंद्रित केल्यास नक्कीच हा प्रकार कमी होईल. ९८ टक्के गुण मिळवूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याच्या घटना यानंतर नक्कीच कमी होतील, असंही जगदेश कुमार यांनी सांगितल.
अर्ज प्रक्रिया कशी असेल?
केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी CUET साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू होईल. NTA नुसार, CUET देशभरातील कोणत्याही केंद्रीय विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंगल-विंडो संधी देईल. परीक्षा संगणक-आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेतली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.