Swadhar Scheme : जाचक अटी आणि निधीच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांना मिळेना स्वाधारचा आधार

राज्य शासन समाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे विद्यार्थी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत आहे.
dr. babasaheb ambedkar swadhar scheme
dr. babasaheb ambedkar swadhar schemesakal
Updated on

पुणे - राज्य शासन समाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे विद्यार्थी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत आहे. ज्या त्या शैक्षणिक वर्षात लाभाची रक्कम मिळत नसल्याची परिस्थिती कायम आहे. गांभीर्याची बाब म्हणजे यासंदर्भात मंत्रालयापासून ते जिल्हा सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र अश्वासनां शिवाय हाती काहीच लागले नसल्याची खंत उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

स्वाधार ही अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील वसतिगृह नसलेल्या विद्यार्थ्यांसाठीची योजना आहे. यामध्ये राहण्याचा व जेवणाचा खर्च ६० हजार रुपये प्रति वर्षानुसार विद्यार्थ्यांच्या खात्यावर देते. मागील तीन वर्षापासून पुणे शहरातील विद्यार्थ्यांना यासंबंधीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडेल आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अशा विद्यार्थ्यांनी विश्रांतवाडी येथील समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांच्या कक्षासमोर एकच गर्दी केली होती. यावेळी डिसेंबर महिना अखेरीस विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजना लाभाची रक्कम वितरित केल्या जाईल, असे आश्वासित करण्यात आले होते.

मात्र, त्यानंतर आता नवे वर्ष उजाडले तरी विद्यार्थी लाभापासून प्रलंबीत आहेत. तसेच विद्यार्थी जर प्रथम वर्षाला स्वाधार योजनेला अर्ज करू शकला नाही. तर तो पूर्ण अभ्यासक्रमादरम्यान स्वाधार योजनेला अर्ज करू शकत नाही, अशा जाचक अटींमुळे विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित राहत आहेत.

दोन वर्षांपासून पाठपुरावा आणि आंदोलने करण्यात आली. तरी शासन निर्णयातील जाचक अटींमध्ये बदल होत नाहीये. परिणामी विद्यार्थी लाभापासून वंचित आहेत. तर दुसरीकडे पुणे जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून शासनाकडे ३५ कोटी मागणी प्रस्तावित आहे. ३५०० पेक्षा जास्त अर्ज संख्या असताना पुणे जिल्ह्याला फक्त आठ कोटी रुपये निधी स्वाधार योजने करिता मिळत आहे.

- राजरत्न बलखंडे, संस्थापक, विद्यार्थी हक्क समिती

अनेक विद्यार्थ्यांना मागील वर्षभरापासून स्वाधारची रक्कम मिळालेली नाही. यंदा राज्यात दुष्काळ असून, मोठ्या अपेक्षेने विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, निधीची कमतरता सांगत विद्यार्थ्यांना योजनेपासूनच वंचित ठेवण्यात येत आहे.

- कृष्णा साठे, महासचिव, एनएसयूआय, पुणे

माझ्या घरच्यांनी मला कर्ज घेऊन पुण्यात शिक्षणासाठी पाठवले. मागच्या दोन वर्षांपासून मी स्वाधारचे पैसे मिळावेत यासाठी कार्यालयाला चकरा मारत आहे, पण दरवेळी निधी नसल्याचे सांगितले जाते. सावकाराचे कर्ज कसे फेडायचे मला चिंता लागली आहे.'

- सुवर्णा घुळवे, अर्जदार, स्वाधार योजना

स्वाधार योजने विषयी मला काय माहिती नव्हते. त्यामुळे मी प्रथम वर्षाला फॉर्म भरू शकले नाही. आता दुसऱ्या वर्षात फॉर्म भरायला गेले तर मला फॉर्म भरता येत नाही, असे सांगण्यात येत आहे.

- प्रियांका जाधव, अर्जदार, स्वाधार योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.