मोखाडा : जव्हार , मोखाडा , विक्रमगड आणि वाडा तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील सुमारे 101 शाळा डिजीटल करण्याचा ऊपक्रम भाजप ने केला आहे. त्यासाठी भाजप चे विक्रमगड विधानसभा प्रचार प्रमुख डाॅ हेमंत सवरा यांनी आमदार श्रीकांत भारतीय यांच्या निधीतून हा ऊपक्रम राबविला आहे.
त्यासाठी दोन वर्षात सुमारे 5 कोटींहुन अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. या ऊपक्रमामुळे, आदिवासी भागातील विद्यार्थी डिजीटल शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. आधुनिक शैक्षणिक पध्दती ग्रामीण भागात रूजावी, स्पर्धेच्या युगात या भागातील विद्यार्थी टिकावा यासाठी भाजप चे विक्रमगड विधानसभा प्रचार प्रमुख डाॅ हेमंत सवरा यांनी डिजिटल स्कुल ही संकल्पना आखली.
त्यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तालुक्यात पहिल्या वर्षी 66 तर यावर्षी 35 शाळा डिजीटल संच देऊन, आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणल्या आहेत. एका संच साठी 5 लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. त्यासाठी भाजप चे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या निधीतून हा ऊपक्रम राबवुन सुमारे 5 कोटींहुन अधिक निधी खर्च केला असल्याची माहिती मोखाड्यात डाॅ हेमंत सवरा यांनी दिली आहे.
मोखाडा तालुक्यातील कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष संतोष चोथे व आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील , ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे ,
हरी भोये सर, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष महेश आळशी, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले, विक्रमगड तालुका अध्यक्ष दिपक पावडे, सरचिटणीस सौ.ज्योती ताई भोये, राजेंद्र पाटील,सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी व बहुतांश भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
मोखाडा तालुक्यातील वाशाळा, खोच, डोलारा, मोऱ्हांडा, बेरिस्ते, किनिस्ते, खोडाळा, सूर्यमाळ आणि सायदे शाळांना समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले आहेत.मागील वर्षीही पालघर जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यात डिजीटल स्कूल संकल्पना डॉ. हेमंत सवरा यांनी राबवली आहे.
डिजीटल शाळा,ई-क्लास,ई-लर्निंग ही सुविधा अद्ययावत साधनस्वरुप असून विद्यार्थ्यांच्या अध्ययनास पुरक आहे.एकाच क्लिकवर अभ्यासक्रमा नूसार साठवलेली माहिती उपलब्ध होणार असल्याने परिणामी विद्यार्थ्यांचा वेळ वाचून विद्यार्थी अधिक प्रगत होणार आहेत. यामध्ये 55 इंचीच स्क्रीन व अनूषंगिक उपकरणे असा 5 लक्ष रुपयांचा एक डिजीटल संच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.