अभ्यासाव्यतिरिक्त फावल्या वेळेमध्ये पायलने आई-वडिलांना शेतीचा कामांमध्ये मदत करणे, गायींच्या धारा काढणे, बकऱ्यांच्या पिल्लांना दूध पाजणे, बकऱ्या चरायला नेणे अशी छोटी-मोठी कामे केली आहेत.
-प्रकाश शेलार
खुटबाव : दौंड (ता. पारगाव) येथील पायल संतोष धायगुडे या मेंढपाळाच्या मुलीने बारावी परीक्षेत (12th Exam Result) विज्ञान शाखेमध्ये बारामती येथील शारदाबाई पवार विद्यालयात (Shardabai Pawar Vidyalaya) ८८.८३ गुण मिळवत यशाला गवसणी घातली आहे. पायलच्या यशामुळे पारगाव परिसरातील गांडळवाडीमधील धनगरवाड्यात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
पायलचे वडील संतोष धायगुडे अल्पभूधारक शेतकरी असून धायगुडे परिवाराला गांडळवाडी येथे अवघे ३० गुंठे जमिन आहे. एकत्रित १० व्यक्तींचे कुटुंब असणाऱ्या धायगुडे परिवाराने दैनंदिन उपजीविकेसाठी ७० मेंढ्या व गायींचा गोठा तयार केला आहे. पायल (Payal Dhaygude) लहानपणापासूनच हुशार आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा गांडळवाडी येथे झाल्यानंतर तिने सुरुवातीस पायी, त्यानंतर स्वतःच्या सायकलवर ३ किलोमीटर प्रवास करत न्यू इंग्लिश स्कूल पारगाव येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले.
अभ्यासाव्यतिरिक्त फावल्या वेळेमध्ये तिने आई-वडिलांना शेतीचा कामांमध्ये मदत करणे, गायींच्या धारा काढणे, बकऱ्यांच्या पिल्लांना दूध पाजणे, बकऱ्या चरायला नेणे अशी छोटी-मोठी कामे केली आहेत. इयत्ता दहावीमध्ये तिला ९०.८३ टक्के गुण मिळाले. त्यानंतर तिचे वडील संतोष धायगुडे हे पायल सोबत धायगुडे परिवाराचे मूळगाव असणाऱ्या तरडगाव (जिल्हा सातारा) येथे दुचाकीवर जात असताना रस्त्यामध्ये त्यांनी शारदानगर येथील शाळा पाहिली. याच शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा निश्चय या बापलेकीने केला.
प्रवेश फीचा प्रश्न उभा राहिल्यानंतर पायलने स्वतःच्या बँक खात्यावरील एनएमएमएस परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आल्यामुळे मिळालेले ३० हजार रुपये वडिलांना देत प्रवेश मिळवला. गेली २ वर्ष दिवसभरामध्ये १० ते १२ तास अभ्यास केल्यामुळे पायलने दणदणीत यश मिळवले आहे. या यशामुळे आई भाग्यश्री धायगुडे व वडील संतोष धायगुडे यांनी पेढा भरून पायलचे अभिनंदन केले. यावेळी पायलचे आजोबा मल्हारी धायगुडे, आजी गवुबाई धायगुडे, चुलते कांतीलाल धायगुडे, चुलती सीमा धायगुडे, पारगावचे माजी उपसरपंच सोमनाथ ताकवणे, चंद्रकांत महाराज धायगुडे ,शहाजी हंडाळ ,विठ्ठल चितळकर, महादेव डोंबाळे ,नामदेव धायगुडे आदी उपस्थित होते.
कुटुंबामध्ये बारावी पास झालेली मी पहिली व्यक्ती आहे. मिळालेल्या यशाचा आनंद आहे. परंतु, एवढ्यावर थांबणार नाही. दिवस-रात्र काम करणाऱ्या आई-वडील व कुटुंबीयांच्या कष्टाचे चीज करायचे आहे. भविष्यामध्ये आयएएस अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.
-पायल धायगुडे, विद्यार्थिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.