येवला (जि.नाशिक) : दहावीनंतर पॉलिटेक्निक (अभियांत्रिकी पदविका) किंवा बारावीनंतर इंजिनिअरिंगसाठी (अभियांत्रिकी) प्रवेश घ्यायचा म्हटले, की ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे संकट उभे राहते ते इंग्रजीचे. मात्र, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पॉलिटेक्निकचे शिक्षण सोपे जावे, यासाठी या वर्षीपासून मराठीचा पर्याय तंत्रशिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिला आहे. यामुळे या वर्षी पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला प्रतिसाद मिळणार असून, सध्या प्रवेशप्रक्रियेला गती मिळाली आहे. (Polytechnic-now-has-marathi-language-option-jpd93)
गुड न्यूज : दहावीच्या निकालानंतर पॉलिटेक्निक प्रवेशाला प्रतिसाद
राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे राबविण्यात येणारा पॉलिटेक्निक आभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या ऐच्छिक पर्यायाने द्विभाषिक (मराठी व इंग्रजी) पद्धतीने चालणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातून तंत्रशिक्षणाकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल नक्कीच वाढणार आहे. विद्यार्थ्यांना अध्यापन व उत्तरपत्रिका लिहिण्याची भाषाही मराठी निवडता येणार आहे. तर विद्यार्थ्यांचे इंग्रजी संवाद कौशल्य वाढविण्यासाठी संस्थास्तरावर टिटोरियल राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. अर्थात, माध्यम मराठी की इंग्रजी निवडायचे, याचे स्वातंत्र्य संबंधित महाविद्यालय व विद्यार्थ्यांनाही देण्यात आले आहे.
अर्ज भरण्याला मुदतवाढ हवी!
दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर पालकांचे पुढील प्रवेशासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याअनुषंगाने तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली असून, २३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांना अर्ज भरणे तसेच, कागदपत्र पडताळणे सोपे होण्यासाठी जवळपास सर्वच पॉलिटेक्निक महाविद्यालयांत शासनाने सुविधा केंद्र उपलब्ध करून दिले आहे.
कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता
प्रवेश अर्ज दाखल करणे तसेच, मूळ कागदपत्रे अपलोड करण्याबाबत संचालनालयाकडून मुदतवाढ मिळत असते. सद्यःस्थितीत विद्यार्थ्यांकडे कागदपत्रांची पूर्तता नाही. कोरोना परिस्थितीमुळे उपलब्ध होण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचीही मागणी होत आहे. अंतिम गुणवत्ता यादीनंतर पुढील कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुन्हा येणार दिवस!
दोन-तीन वर्षांपासून पॉलिटेक्निकसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेनासे झाले होते. तर, निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहण्याचे प्रकार घडत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडली. मात्र, विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ लागल्याने पुन्हा एकदा दहावीनंतर पॉलिटेक्निककडे कल वाढला आहे. त्यातच मराठीचा पर्याय दिल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून, यामुळे ग्रामीण भागातील पॉलिटेक्निकच्या जागा भरल्या जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
◆ प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक
√ ऑनलाइन अर्ज भरणे व कागदपत्रे अपलोड करणे : ३० जून ते २३ जुलै
√ अंतिम गुणवत्तायादी : ३१ जुलै
◆थेट द्वितीय वर्ष प्रवेश वेळापत्रक
√ ऑनलाइन अर्ज भरणे व कागदपत्रे अपलोड करणे : १३ जुलै ते ४ ऑगस्ट
√ अंतिम गुणवत्तायादी : १२ ऑगस्ट
■ नाशिकमधील पॉलिटेक्निक...
★एकूण पॉलिटेक्निक : २५
(शासकीय-१ । खासगी- २४)
★एकूण प्रवेशक्षमता : ८६४०
दहावीनंतर तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा करून विद्यार्थ्यांना कमी वयात शासकीय किंवा खासगी क्षेत्रात नोकरी तसेच, व्यवसायासाठी चांगली संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा कल तंत्रशिक्षणाकडे वाढत आहे. मराठी भाषेचा पर्याय दिल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढेल. - गीतेश गुजराथी, प्राचार्य, एमआयटी पॉलिटेक्निक, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.