Chandigarh : आता महाविद्यालयांत सुरु होणार सायबर सुरक्षा, पत्रकारितेचा अभ्यासक्रम; शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

राज्यातल्या ३७ सरकारी महाविद्यालयांमध्ये नवे अभ्यासक्रम व विषय सुरु करण्यात आले आहेत.
Post Graduate Diploma Course in Journalism
Post Graduate Diploma Course in Journalismesakal
Updated on
Summary

सरकारी महाविद्यालयांमध्ये नॅशनल व सायबर सुरक्षा, तसेच संरक्षण पत्रकारितेचे पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

चंदीगढ : येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्य सरकारने नॅशनल व सायबर सुरक्षा, तसेच संरक्षण विषयक पत्रकारितेचे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (Post Graduate Diploma Course in Journalism) सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उच्च शिक्षणमंत्री मूल चंद शर्मा यांनी सांगितले. राज्यातल्या सरकारी महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम सुरु होणार आहेत.

याबाबतची अधिक माहिती देताना ते (Mool Chand Sharma) म्हणाले, की २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात सोनिपत जिल्ह्यातील खारखोडा आणि अंबाला जिल्ह्यातील शाहजादपूर येथील सरकारी महाविद्यालयांमध्ये नॅशनल व सायबर सुरक्षा, तसेच संरक्षण पत्रकारितेचे पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त खारखोडा आणि जझ्झर इथल्या सरकारी महाविद्यालयांमध्ये संरक्षण विषय पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येत आहे.

राज्यातल्या ३७ सरकारी महाविद्यालयांमध्ये नवे अभ्यासक्रम व विषय सुरु करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. "त्या व्यतिरिक्त नऊ महाविद्यालयांमधल्या जागाही वाढविण्यात आल्या आहेत. रतिया, फतेहाबाद, फारुखनगर आणि गुरुग्रामच्या सेक्टर ९ मधिल महाविद्यालयांममध्ये प्रत्येकी ८० जागा वाढविण्यात आल्या आहेत.

Post Graduate Diploma Course in Journalism
Loksabha Election : काँग्रेस 'ती' चूक पुन्हा करणार नाही; सांगली लोकसभेसाठी नेते आक्रमक, NCP ला देणार शह?

जिंदच्या सरकारी महाविद्यालयात एम.काॅम अभ्यासक्रमासाठी २० जागा तर सफिदोनच्या सरकारी महाविद्यालया कँप्यूटर अॅप्लिकेशन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी २० जागा वाढवण्यात आल्या आहेत," असंही मूल चंद शर्मा यांनी सांगितले.

Post Graduate Diploma Course in Journalism
Karnataka Politics : दारुण पराभवानंतर आता विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये चुरस; 'या' नेत्याचं नाव आघाडीवर

बीएच्या पंजाबी अभ्यासक्रमासाठी कैथियाल जिल्ह्यातल्या लडाना चाकू इथल्या सरकारी महाविद्यालयात ४० जागा वाढविण्यात आल्याची माहितीही उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिली. त्याच प्रमाणे कर्नालच्या बस्तारा इथल्या महिलांसाठीच्या सरकारी महाविद्यालात राज्यशास्त्र, भूगोल आणि इतिहास या विषयाच्या बीए पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी २० जागा वाढविण्यात आल्याचंही ते म्हणाले.

Post Graduate Diploma Course in Journalism
Nanded Crime : गावात आंबेडकर जयंतीची मिरवणूक का काढली? दलित तरुणाची पोटात खंजीर खूपसून हत्या

नाॅन मेडिकल कंप्युटर सायन्स या विषयातल्या बीएससी पदवीसाठी कुरूक्षेत्र मधल्या पलवलच्या मुलींसाठीच्या सरकारी महाविद्यालयात २० जागा तर महेंद्रगढच्या नारनौलमधील सरकारी महाविद्यालयात झुलाॅजी विषयाच्या एमएससी परीक्षेसाठी २० जागा वाढविण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.