प्रणालीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. घरी अठराविश्व दारिद्र असताना प्रणालीने आपली जिद्द व मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
पाली : बारावी परीक्षेचा निकाल (12th Exam Result) आज मंगळवारी (ता. 21) जाहीर झाला. या परीक्षेत पालीतील ग. बा. वडेर व व. ग. ओसवाल ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी व राबगाव येथील रहिवाशी प्रणाली श्याम खैरे (Pranali Khaire) हिने तब्बल 80.83 टक्के गुण मिळवून सुधागड तालुक्यात (Sudhagad Taluka) प्रथम आली आहे. प्रणालीची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून तिची आई सुषमा व वडील श्याम हे मोलमजुरी करतात. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत प्रणालीने हे यश संपादन केले आहे.
प्रणालीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. घरी अठराविश्व दारिद्र असताना प्रणालीने आपली जिद्द व मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशात श्री. कॉमर्स क्लासेसचे संचालक प्रा. संतोष भोईर यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच तिच्या कॉलेजचे शिक्षक यांनी देखील तिला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
प्रणालीच्या शिक्षणाचा खर्च तिच्या भावाने केला आहे. तिचा भाऊ तात्पुरत्या स्वरूपात काम करून एमएससीचे शिक्षण घेत आहे. प्रणाली शालेय व ज्युनियर कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धेत नेहमी जिल्ह्यात व कोकण विभागात अव्वल स्थानी आली आहे.
अभ्यासाबरोबरच सहशाले उपक्रमात देखील प्रणाली दिलेले सहभाग घेत असे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता जिजाऊ, याच बरोबर स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारकांवर तिने अनेक व्याख्याने दिली आहे. प्रणालीचे हे यश पाहून तिच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले. प्रणालीला एमबीए फायनान्स (MBA Finance) करायचे आहे. यासाठी ती आत्तापासूनच तयारी करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.