परदेशी शिकताना : महती ऑक्सफर्ड विद्यापीठाची..

जगात पहिल्या नंबरचं विद्यापीठ म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठ. हे विद्यापीठ सहस्राब्दीची कथा सांगते. असे हे सर्वांत जुने ऑक्सफर्ड विद्यापीठ जगात आजही शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Oxford University
Oxford UniversitySakal
Updated on
Summary

जगात पहिल्या नंबरचं विद्यापीठ म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठ. हे विद्यापीठ सहस्राब्दीची कथा सांगते. असे हे सर्वांत जुने ऑक्सफर्ड विद्यापीठ जगात आजही शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

- ॲड. प्रवीण निकम

मागच्या भागात आपण इंग्रजीची मानांकन चाचण्या तसेच विद्यापीठ निवडताना आपण कोणती खबरदारी घ्यायला हवी? याच्याबद्दल चर्चा केली. सगळ्यांचेच स्वप्न असते की, सर्व शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण करून चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळावा. भारतात उच्च शिक्षणासाठी अनेक चांगले विद्यापीठे आहेत याविषयी आपण समजून घेऊच.

परदेशी शिक्षणाचा विचार केला तर ब्रिटन हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. आपल्या देशातील विद्यापीठ आणि येथील विद्यापीठांमध्ये काय फरक आहे? ही सर्व विद्यापीठे जागतिक पातळीवरील आहेत तसेच ब्रिटन येथील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सरकारच्या मालकीचे नाहीत किंवा त्या सरकार मार्फत चालवल्या जात नाहीत. येथील शैक्षणिक संस्था, विद्यापीठ हे स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. विद्यापीठ प्रभावीपणे काम करत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी येथे कौन्सिल, गव्हर्निंग बॉडीज असतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश केला जातो. सर्वांच्या विचारविनिमयातून शैक्षणिकदृष्ट्या देवाणघेवाणीतून विद्यापीठ चालवण्याचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. येथील प्रत्येक विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या विषयासाठी प्रसिद्ध आहे. आपल्याकडे एखाद्याचे इंग्रजी चांगले असेल किंवा हुशार असेल तर सामान्य माणूस पटकन बोलून जातो, ‘काय रे, ऑक्सफर्डला शिकला का?’

तसंच हे महत्त्वपूर्ण आणि जगात पहिल्या नंबरचं विद्यापीठ म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठ. हे विद्यापीठ सहस्राब्दीची कथा सांगते. असे हे सर्वांत जुने ऑक्सफर्ड विद्यापीठ जगात आजही शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या विद्यापीठाचे उद्देश आणि चारित्र्य सुसंगत आहे. येथे आपल्याला शैक्षणिक स्वातंत्र्य, संस्थात्मक स्वायत्तता मूल्ये प्रकर्षाने पाहावयास मिळतात.

दिवसागणिक व काळानुरूप येथील शैक्षणिक पसारा वाढत गेला आणि या विद्यापीठाच्या इमारती वाढत गेल्या. लंडनपासून साधारणतः रेल्वेने १ तास आणि बसने २ तासाच्या अंतरावर ऑक्सफर्ड नावाचं गाव आहे. हे गाव म्हणजेच विद्यापीठ. अगदी आपण या गावात प्रवेश केला की, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारती सुरू होतात.

शैक्षणिक इमारतींमध्येच निवासी घरे, दुकाने, मार्केट आणि शैक्षणिक इमारती असा संपूर्ण गावभर या विद्यापीठाचा पसारा पाहायला मिळतो. विविध विषयाचे शिक्षण देणारे वेगवेगळे शैक्षणिक केंद्रे असून या सर्वांच मिळून ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे. अतिशय जुन्या परंतु खूप काळजीपूर्वक जपलेल्या इमारती येथे आहेत. या इमारतीचं अंतरंग काळानुसार अत्याधुनिक केलेलं आहे. परंतु बाह्यरंग हे जुन्या वास्तुकलेचे उत्तम दर्शन हजारो वर्षांपासून आहे. ही जाणीव होत राहते.

ऑक्सफर्ड या शहरात आपण प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला एका जुन्या गावात प्रवेश केल्याचा फील यायला लागतो. त्याचबरोबर आपण अत्यंत शैक्षणिकदृष्ट्या रम्य वातावरणात प्रवेश केला आहे, हे जाणवायला लागतं. जेवढे सौंदर्य या इमारतीने जपले आहे तेवढेच आपली शैक्षणिक गुणवत्ता देखील कायम जपली आहे. प्रत्येक वर्षी हजारो करोडो रुपयांची उलाढाल हे विद्यापीठ चालवण्यासाठी होत असेल. किती तरी पैसे हा गुणवत्तापूर्ण संशोधन कार्यासाठी राखीव ठेवला जातो आणि जगभरातील हुशार आणि हुन्नरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन या विद्यापीठात प्रवेश दिला जातो. या विद्यापीठात प्रवेशासाठी भरभक्कम फी असली तरी येथील खर्च फक्त मिळणाऱ्या फी वर भागात नाही, परंतु जगाला अतिउच्च दर्जाचे विद्यार्थी घडवणाऱ्या या शिक्षणगंगेला भरभरून देणगीही मिळते. यातून या विद्यापीठाचा खर्च आणि नवीन नवीन सुधारणा केल्या जातात.

गुणवत्तेचा विचार केल्यास, आजवर ऑक्सफर्ड विद्यापीठाने २८ ब्रिटिश पंतप्रधान, किमान ३० आंतरराष्ट्रीय नेते, ५५ नोबेल पारितोषिक विजेते आणि १२० ऑलिंपिक पदक विजेते दिले आहेत. याबरोबर अनेक महत्त्वाचे लोक या विद्यापीठाने घडविले आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यासुद्धा याच विद्यापीठात शिकल्या. शैक्षणिकदृष्ट्या विकसित झालेल्या या विद्यापीठाबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. आपण थोडीशी शाब्दिक स्वैर या लेखाच्या माध्यमातून ऑक्सफर्डविषयी केली. जेणेकरून आपल्यालाच अंदाज येईल की, ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठांना जगात मानाचे स्थान का आहे? पुढच्या लेखात आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातील विविध शाखांबद्दल अधिक जाणून घेऊयात.

(लेखक हे ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()