हल्लीच्या काळात बहुतांश अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यात पदवी, पदव्युत्तर परीक्षांचाही समावेश होतो. तसेच, पीएच-डी, नेट-सेट यांसारख्या परीक्षाही करिअरच्या विविध टप्प्यांवर द्याव्या लागतात. त्यामुळे वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) प्रश्नपत्रिका सोडवण्याची तयारी, कमी वेळात अचूक उत्तर शोधण्याची क्षमता, वेळेचं भान अशा अनेक गोष्टी डोक्यात ठेवत सराव करावा लागतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर हे तारतम्य फारच जपावे लागते. यासाठी खाली काही महत्त्वपूर्ण टीप्स दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यानुसार अंमलबजावणी केल्यास त्यांना कोणत्याही प्रवेश परीक्षेचे दडपण येणार नाही.