सामाजिक, आर्थिक, आणि पर्यावरण या मूलभूत स्तंभांवर आधारित शाश्वत ग्रामीण विकास ही संकल्पना संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य असलेल्या राष्ट्राने सहमती दर्शविलेल्या सतरा विकास लक्ष्यांसह साधली जाऊ शकते.
संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी विकास आयोगाच्या (सी.एस.डी.) 17 व्या सत्राच्या अहवालानुसार “शाश्वत ग्रामीण विकास राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय व्यवहार्यतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी हे अत्यंत आवश्यक आहे कारण सबंध जगामध्ये गरीबी ग्रामीण भागामध्ये अत्यधिक आहे . दारिद्र्याच्या अभ्यासाला अनेक पैलू आहेत , शहरी-ग्रामीण, प्रादेशिक आणि उपप्रादेशिक संदर्भ आहेत. शाश्वत जीवन जगण्यास हातभार लावणा ग्रामीण विकासाच्या उपक्रमां सोबत समन्वय साधायला हवां. जागतिक पातळीवर, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन , सर्वसामान्य लोकांचा विकासप्रक्रियेमध्ये सहभाग वाढवून होणाऱ्या प्रयत्नांच्या माध्यमातूनच आपण दारिद्र्य निर्मूलन करू शकतो.”
सर्व सामान्य जनतेची जीवनशैली सुधारणे आणि पर्यावरणाचे जतन करणे हेच शाश्वत विकासाचं अंतिम उद्दीष्टे आहे. ग्रामीण-शहरी दरी अजूनही संपूर्ण जगात अस्तित्वात आहे. शाश्वत भविष्यासाठी ग्रामीण विकासात काही मूलभूत गरजा असतात. ग्रामीण विकास ही अशी प्रक्रिया आहे जी सामाजिक बदल आणि शाश्वत आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागातील प्रगतीची शोध घेते. ग्रामीण भागामध्ये मुख्यतः ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, धार्मिक पर्यटन आणि पर्यावरण पर्यटन हे मुख्य आर्थिक क्षेत्र आहेत . शेती, वनीकरण, ऊर्जा, खाणकाम, किंवा मासेमारी अशा उपक्रमा वर अवलंबून असणारा वर्ग कमी होतोय. या अशा अनेक क्षेत्रातील संधी कमी होत असताना ग्रामीण उद्योजकतेला चालना देणारे आणि शाश्वत असलेले शेती पूरक, पर्यावरण पूरक आणि आर्थिक उन्नतीच्या दिशेने वाटचाल करणारे उपक्रम राबवणं खूप गरजेचं बनलं आहे.
ग्रामीण भागातील लोक मुख्यतः शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण कृषी उत्पादन आणि उपभोग प्रक्रिया भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात प्रमुख भूमिका बजावते. ग्रामीण विकासाचे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे शेतीची उत्पादकता वाढविणे, वेगवान आर्थिक परिवर्तन साध्य करणे, शेतकर्याचा नफा वाढविणे आणि निवडक कृषी उत्पादनांच्या घरगुती उत्पादनांमध्ये वाढ करणे.
धोरणकर्ते आणि नीतिकारानी ग्रामीण विकास हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर वापरला असला तरी ग्रामीण विकास म्हणजे काय, हे नक्की समजलं आहे कि नाही असा प्रश्न निर्माण होतो. हि संकल्पनाच मुळात काळानुसार बदलायला हवी. गेल्या तीन दशकांत ग्रामीण विकासाची रचना लक्षणीय बदलली आहे. १970 च्या दशकापर्यंत ग्रामीण विकास हा कृषी विकासाचा समानार्थी संज्ञा होती . म्हणूनच सर्व धोरण कर्त्यांचा आणि राष्ट्राचा कृषी उत्पादन वाढविण्यावर भर होता. जस जशी औद्योगिकीकरणास बळकटी मिळत गेली तशी ग्रामीण विकासाची संकल्पना देखील बदलत आहे. मुख्यतः जमीन, शेतकरी, शेतमजूर, कामगार, यांचा मुख्य प्रवाहात सहभाग वाढविण्याबरोबरच नैसर्गिक स्रोतांचा वापर आणि विकास, प्रभावी पीक पद्धती, प्रभावी विपणन नीती, सरकारी योजना, आंतरराष्ट्रीय संस्थेची मदत, अशा अनेक गोष्टींचा समावेश सध्याच्या ग्रामीण विकासात केला जातो.
सस्टेनबल रूरल डेव्हलपमेंट ही ग्रामीण जनतेच्या उत्कर्षासाठी जाणीवपूर्वक केल्या जाणार्या बदलांची प्रक्रिया आहे. हे सामान्यत: तुलनेने वेगळ्या आणि विरळ लोकवस्ती असलेल्या भागातील लोकांचे जीवनमान आणि आर्थिक कल्याण सुधारण्याच्या प्रक्रियेस संदर्भित करते. जागतिक उत्पादन नेटवर्कमधील बदल आणि वाढीव शहरीकरणामुळे ग्रामीण भागाचे वैशिष्ट्य बदलले आहे.
वाढतं ग्रामीण पर्यटन, ग्रामीण भागातील विविध उत्पादकांची वाढ, करमणुकीचे साधने, आणि विविध तंत्रज्ञान यामुळे शेती व्यवसाय खूप प्रभावी बनत आहे. शेती , शेती संलग्नित व्यवसाय आणि ग्रामीण उद्योग यांचं राष्ट्रच्या आर्थिक विकासात खूप मोलाचं योगदान आहे. भारतीय शेती आणि ग्रामीण क्षेत्रात झालेली हरित आणि धवल क्रांती मुळे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 18 टक्के क्षेत्राचा वाटा शेतीचा आहे. ग्रामीण क्षेत्राने गेल्या काही दशकांत जमीन, पाणी आणि सौरऊर्जा या अशा मोठ्या संसाधनांसह महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. शाश्वत ग्रामीण विकासासाठी अन्न सुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि पर्यावरणास शाश्वत तंत्रज्ञान जसे की मातीचे संरक्षण, शाश्वत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि जैवविविधता संरक्षण यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास करणं आणि विकासाची उद्दीष्ट्ये साध्य कारण हे क्रमप्राप्त बनले आहे .
वाढतं ग्रामीण पर्यटन, ग्रामीण भागातील विविध उत्पादकांची वाढ, करमणुकीचे साधने, आणि विविध तंत्रज्ञान यामुळे शेती व्यवसाय खूप प्रभावी बनत आहे. शेती , शेती संलग्नित व्यवसाय आणि ग्रामीण उद्योग यांचं राष्ट्रच्या आर्थिक विकासात खूप मोलाचं योगदान आहे. भारतीय शेती आणि ग्रामीण क्षेत्रात झालेली हरित आणि धवल क्रांती मुळे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 18 टक्के क्षेत्राचा वाटा शेतीचा आहे. ग्रामीण क्षेत्राने गेल्या काही दशकांत जमीन, पाणी आणि सौरऊर्जा या अशा मोठ्या संसाधनांसह महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. शाश्वत ग्रामीण विकासासाठी अन्न सुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि पर्यावरणास शाश्वत तंत्रज्ञान जसे की मातीचे संरक्षण, शाश्वत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि जैवविविधता संरक्षण यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास करणं आणि विकासाची उद्दीष्ट्ये साध्य कारण हे क्रमप्राप्त बनले आहे.
या आव्हाना ना सामोरे जाण्यासाठी अशा विषयांचं शिक्षण हि काळाची गरज बनली आहे . हीच गरज ओळखून एम. आय. टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ने या शैक्षणिक वर्षांपासून एम एस सी इन सस्टेनबल रूरल डेव्हलपमेंट हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. सस्टेनबल रूरल डेव्हलपमेंट हा कोर्स प्रामुख्याने ग्रामीण समुदायांना व्यापक दृष्टीकोनातून विकासाकडे जाण्याची गरज यावर केंद्रित आहे. अभ्यास क्रमामध्ये ग्रामीण आणि कृषी विकासाच्या उद्दीष्टांच्या विस्तृत श्रेणीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
शिक्षण, उद्योजकता, भौतिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा या सर्व गोष्टी ग्रामीण क्षेत्र विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.या अभ्यासक्रमा मध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित आर्थिक विकासाच्या धोरणावर जोर देऊन ग्रामीण विकास कसा साध्य केला जाऊ शकतो हे सांगितलं जाते.
ग्रामीण विकासासाठी नवीन व चालू असलेल्या योजनांची ओळख करुन देणे आणि त्यासंबंधित समस्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा उद्देश या कोर्स च्या माध्यमातून साधला जातो. सार्वजनिक, खासगी आणि नागरी क्षेत्रांनी आपल्या योगदानाने ग्रामीण क्षेत्रात सुधारणा करुन शाश्वत ग्रामीण विकासासाठी एकत्रितपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थेत रोजगाराच्या अनेक संधी आहेत. वर्ल्ड बँक, युनिसेफ,यू एन डी पी अशा अनेक अंतर राष्ट्रीय संस्थे मध्ये देखील संधी उपलब्ध आहेत. नोकरी बरोबरच वर उल्लेख केलेल्या संस्थेमध्ये आपण सल्लागार म्हणून देखील काम करू शकतो. रिसर्च अनॅलिस्ट, पॉलिसि मॅनेजर , प्रोजेक्ट मॅनेजर, कन्सल्टंट अशा अनेक पदावरती काम करता येत. कोणत्याही शाखेचा पदवीधर या कोर्स साठी पात्र आहे . समाज आणि पर्यावरणाचं संवर्धन करत राष्ट्राच्या आर्थिक विकासात मोलाचं योगदान देण्यासाठी युवकांनी अशा कोर्सचा लाभ घ्यावा. एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी प्रवेश खुले आहेत.
अर्ज करण्यासाठी येथे संपर्क साधा : WhatsApp : +91 9881492848 Phone : +91 20 – 7117 7137 or +91 20 – 7117 7142 किंवा ह्या संकेतस्थळावर भेट द्या: admissions.mitwpu.edu.in/bdes/
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.