CETच्या परीक्षा केंद्रांबाबत बोर्डाकडून घोळ

चूक लक्षात येताच केली सुधारणा
MSBSHSE
MSBSHSEsakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) अकरावी (FYJC) प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा (CET) घेतली जाणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना परीक्षा केंद्रासाठी परिसराची निवड करावी लागत आहे. यासाठी ऑनलाइन अर्जावर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात पुणे विभागीय शिक्षण मंडळाचाच गोंधळ उडाला. (pune divisional board of education confused FYJC cet paper)

पुण्यातील पूर्व भागांमध्ये पश्चिम भागातील ठिकाणांचा तर पश्चिम भागात पूर्वेकडील ठिकाणांचा उल्लेख केलेले परिपत्रक मंडळाने प्रसिद्ध केले. मात्र, मंडळाला आपली चूक लक्षात आल्यानंतर तातडीने त्यात सुधारणा करण्यात आली. अकरावी प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी राज्यात ‘सीईटी’ घेतली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासाठी परिसर निवडण्याचा पर्याय दिला आहे. यात पुणे शहरासाठी पुणे पुर्व आणि पुणे पश्चिम अशी विभागणी केली आहे. तर हवेली हा पर्याय ग्रामीण भागातील परीक्षा केंद्राचा परिसर म्हणून दिला आहे.

त्यामुळे परीक्षा केंद्राचा परिसर निवडण्यात विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे विभागीय मंडळाने पुणे पूर्व आणि पुणे पश्चिम भागातील परिसरांची यादी परिपत्रकांद्वारे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. परंतु, त्यात पूर्व भागांमध्ये पश्चिम भागातील ठिकाणे, तर पश्चिम भागात पुर्वेकडील ठिकाणांचा उल्लेख होता. ही चुक लक्षात आल्यानंतर काही वेळातच पुणे विभागीय मंडळाने त्वरीत दुरूस्ती करून सुधारित यादी परिपत्रकाद्वारे संकेतस्थळावर अपडेट केले.

MSBSHSE
रांजणगाव : अंगारकीनिमित्त महागणपती मंदिरात फुलांची सजावट

‘‘पुण्यातील परीक्षा केंद्राच्या निवडीसाठी परिसरनिहाय यादीतील चुक ही छपाईतील चुक (प्रिंटिंग मिस्टेक) होती. परंतु ही दुरूस्ती त्वरीत करून सुधारित यादी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना काही चुका झाल्यास त्या दुरूस्त (एडिट) करण्याची संधी आणि सुविधा दिली जाईल," अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

MSBSHSE
पुणे - शिरुर रस्त्यावरील दुमजली पुलासाठी ७२०० कोटी मंजूर !

पुणे शहरासाठी झोन/ परिसर निहाय परीक्षा केंद्र स्थळ :

पुणे पूर्व -

कॅम्प, हडपसर, बंडगार्डन, लुल्लानगर, येरवडा, रास्तापेठ, सोमवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ, खडकी, कोरेगाव पार्क, घोरपडी, पुलगेट, मुंढवा, मंगळवार पेठ, विमानगगर, टिंगरेनगर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, कोंढवा, दिघी, महादेवनगर, धानोरी, उंड्री, पिसोळी आदी.

पुणे पश्चिम -

कर्वेनगर, एरंडवणा, लक्ष्मी रस्ता, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, डेक्कन जिमखाना, टिळक रस्ता, शिवाजीनगर, नारायण पेठ, कसबा पेठ, औध, बाणेर, पर्वती, महर्षीनगर, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, कोथरूड, वारजे , सिंहगड रस्ता, रविवार पेठ, पौड रस्त्या, वडगाव बुद्रुक आदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()