पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) नऊ विभागीय मंडळामध्ये बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत पुणे विभागीय मंडळ (Pune Divisional Board) राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विभागीय मंडळातील दोन लाख ४२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी दोन लाख २९ हजार ३२९ विद्यार्थी (९४.४४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.
विभागीय मंडळात पुणे जिल्ह्यातील ९३.२० टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागीय मंडळांतर्गत पुणे, नगर, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी दोन लाख ४४ हजार ३७८ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यातील दोन लाख ४२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १५ हजार ७९४ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यातील ११ हजार २१ विद्यार्थी (६९.७७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातून एकूण एक लाख ३८ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख ३८ हजार १५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी एक लाख २८ हजार ७६१ विद्यार्थी (९३.२० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.२२ टक्के इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.४१ टक्के इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८१ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्षा मंजूषा मिसकर आणि विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिली.
पुणे : १,३८,१५२ : १,२८,७६१ : ९३.२० टक्के
नगर : ६३,८५७ : ५८,९६४ : ९२.३३ टक्के
सोलापूर : ५६,५९९ : ५२,६२५ : ९२.९७ टक्के
एकूण : २,५८,६०८ : २,४०,३५० : ९२.९३ टक्के
विद्यार्थी : ७३,३६६ : ६७,०६६ : ९१.४१ टक्के
विद्यार्थिनी : ६४,७८६ : ६१,६९५ : ९५.२२ टक्के
एकूण : १,३८,१५२ : १,२८,७६१ : ९३.२० टक्के
विज्ञान : ३,४९६ : २,७४६ : ७८.५४ टक्के
कला : ३,३९० : २,२७३ : ६७.०५ टक्के
वाणिज्य : ४,००१ : २,६६२ : ६६.५३ टक्के
हवेली : १२,१३५ : ११,५०२ : ९४.७८ टक्के
पुणे शहर (पश्चिम) : २९,१९२ : २६,६४४ : ९१.२७ टक्के
पुणे शहर (पूर्व) : २५,७९८ : २३,७१२ : ९१.९१ टक्के
पिंपरी-चिंचवड : १९,८५८ : १८,८१४ : ९४.७४ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.