RTE Admission : २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी २२ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर बालकांच्या प्रवेशासाठी २२ मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
RTE admissions
RTE admissionsesakal
Updated on
Summary

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर बालकांच्या प्रवेशासाठी २२ मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर बालकांच्या प्रवेशासाठी २२ मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची तपासणी करणे आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ५ एप्रिल रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. या सोडतीनुसार निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने यापूर्वी १३ एप्रिल ते ८ मे पर्यंत मुदत दिली होती. दरम्यान प्रवेशाला मुदतवाढ देण्याच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून प्रवेशासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

दरम्यान, आता शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी अध्यादेश काढत या प्रवेश प्रक्रियेला २२ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना आणखी मुदत मिळाली आहे.

प्रवेशाच्या कागदपत्रांची तपासणी करणे आणि प्रवेश निश्चित करणे, यासाठी ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीच्या कालावधीत दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात यावीत, असे शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे. त्यानुसार आता लवकरच प्राथमिक शिक्षण विभागातर्फे प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ दिल्याचे अधिकृत पत्र लवकरच काढण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.