रेल्वे भरती 2022: परीक्षेशिवाय 10वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी 700 हून अधिक पदांची भरती

ईस्ट कोस्ट रेल्वेने (RRC भुवनेश्वर) 756 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
Railway Recruitment of 700 posts
Railway Recruitment of 700 posts
Updated on

Railway Recruitment 2022 : ईस्ट कोस्ट रेल्वेने (RRC भुवनेश्वर) 756 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, टर्नर, पेंटर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मेसन, शीट मेटल वर्कर, मशिनिस्ट, प्लंबर अशा अनेक व्यवसायांसाठी या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०२२ आहे. शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी कोणतीही परीक्षा आणि मुलाखत होणार नाही. ही भरती इयत्ता 10वी आणि ITI अभ्यासक्रमात मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. या गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. (Railway Recruitment of 700 posts for 10th passed candidates)

Railway Recruitment of 700 posts
भारतीय रेल्वे पुन्हा सुरू करतेय 'स्पेशल ट्रेन'; जाणून घ्या यादी

पात्रता- मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डाकडून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि पदाशी संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT द्वारे दिलं गेलेलं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आवश्यक

वयोमर्यादा- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 7 मार्च 2022 पर्यंत किमान 15 आणि कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे.

ओबीसी प्रवर्गासाठी उमेदवारांना तीन वर्षे, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी दहा वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

Railway Recruitment of 700 posts
भारतीय रेल्वे होणार अधिक सुरक्षित, 4G स्पेक्ट्रमला केंद्राची मंजुरी

आवेदन शुल्क- उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

स्टायपेंड- नियमानुसार दिले जाईल.

इच्छुक उमेदवार rrcbbs.org.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

टीप- उमेदवाराने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रशिक्षणार्थीला नियोक्ता कोणताही रोजगार देण्यास बांधील नाही किंवा प्रशिक्षणार्थी नियोक्त्याने देऊ केलेला कोणताही रोजगार स्वीकारण्यास बांधील नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.