मॅनेजमेंट स्किलिंग : जबाबदारीचं ‘डेलिगेशन’

‘डेलिगेशन’ या व्यवस्थापकीय कौशल्याला मराठीत प्रतिशब्द नाही आहे. दुसऱ्यांना अधिकार सुपूर्द करणे असे चार शब्द वापरल्यावर डेलिगेशन शब्दाचा अर्थ ध्वनित होतो.
Delegation
DelegationSakal
Updated on
Summary

‘डेलिगेशन’ या व्यवस्थापकीय कौशल्याला मराठीत प्रतिशब्द नाही आहे. दुसऱ्यांना अधिकार सुपूर्द करणे असे चार शब्द वापरल्यावर डेलिगेशन शब्दाचा अर्थ ध्वनित होतो.

‘डेलिगेशन’ या व्यवस्थापकीय कौशल्याला मराठीत प्रतिशब्द नाही आहे. दुसऱ्यांना अधिकार सुपूर्द करणे असे चार शब्द वापरल्यावर डेलिगेशन शब्दाचा अर्थ ध्वनित होतो. एखाद्या व्यवसायाला थोडं रंगरूप आल्यावर व्यावसायिकाने जबाबदाऱ्या आपल्या सहायकाला सुपूर्द कराव्यात असं अभिप्रेत असतं. म्हणायला अत्यंत सोपी प्रतिक्रिया; पण प्रत्यक्षात आणायला अतिशय अवघड. त्याला काही कारणं आहेत. ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकावी असे लोक आपले सहकारी म्हणून असणं ही फार अनुकूल परिस्थिती; पण ती सहजासहजी तयार होत नाही. ती तयार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे आपली इंटरव्ह्यू प्रोसेस इतकी सक्षम करायची, की ती जबाबदारी निभावणारी लोक घ्यायची किंवा व्यवसायाची इकोसिस्टम अशी बनवायची की असे लोक अंतर्गत तयार करायचे.

ही झाली एक बाजू. मात्र, दुसरी महत्त्वाची बाजू असते ती म्हणजे आपली मानसिकता आहे का जबाबदारी डेलिगेट करण्याची. मुख्य म्हणजे ती जबाबदारी देताना आपण अधिकारही देतो आहे का? बऱ्याचदा व्यावसायिकाला किंवा व्यवस्थापकाला जबाबदारी तर द्यायची असते; पण त्या बरोबरीनं द्यावे लागणारे अधिकार मात्र द्यायची तयारी नसते. ‘हे तू कर; पण फायनल करण्याच्या अगोदर एकदा मला विचार,’ हा शेवटचा संवाद झाला, की आतापर्यंत जबाबदारी देण्याचं फक्त नाटक केलं होतं असं दिसून येतं.

डेलिगेशन आपल्याला अनेक वेळा करावं लागतं. सगळ्यात पहिले व्यावसायिकाला हे समजून घेतलं पाहिजे की त्याला व्यवसायाच्या सर्व बाजूंची पूर्णतः माहिती नसते आणि असली तरी बऱ्याचदा वृद्धीला पोषक नसते. जसजसा व्यवसाय वाढत जातो, तसं काही जबाबदारी ही त्या क्षेत्रातील माहीतगार लोकांना देणं हे व्यवसायाला पोषक ठरतं. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय हे शक्यतो इंजिनियर लोकांनी चालू केले असतात. तांत्रिक क्षेत्रातील त्यांचं ज्ञान हे व्यवसायपूरक असलं, तरी बऱ्याचदा फायनान्स या क्षेत्रातील त्यांचं ज्ञान हे तोकडं असतं. यावेळी फायनान्स ज्यांना कळतं असे लोक व्यवसायात आणून त्यांना त्या डिपार्टमेंटची जाबाबदारी देणं शहाणपणाचं ठरतं. असंच मी एचआर किंवा पर्चेस क्षेत्राबद्दल म्हणू शकीन. थोडक्यात सांगायचं तर व्यावसायिकाने आपली स्ट्रेंथ ओळखून तिचा व्यवसायासाठी वापर करावा आणि ज्या क्षेत्रात वीकनेस आहे ती जबाबदारी दुसऱ्यांना द्यावी.

बऱ्याचदा कामाचा आवाका वाढतो आणि व्यावसायिकाला भविष्यात काय करायचं यावर जास्त काम करावं लागतं. ते करताना व्यावसायिक हा दैनंदिन कामात अडकून पडला तर तो फ्युचर प्लॅनिंग करू शकत नाही. खरंतर व्यवसायाने एक चांगली पातळी गाठल्यावर व्यावसायिकाने नवीन उत्पादन शोधणे, नवीन मार्केट शोधणे, भौगोलिकदृष्ट्या व्यवसायाची वाढ करणे या विविध क्षेत्रात काम कारणं अभिप्रेत असतं. या सर्व गोष्टीसाठी त्याला मानसिकदृष्ट्या वेळ मिळावा यासाठी त्यानं आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये दुसरी किंवा तिसरी फळी तयार करून त्यांना जबाबदारीचं वितरण करणं आणि स्वतः व्यवसायवृद्धीसाठी वेळ काढणं हे यशस्वी उद्योगाचं गमक आहे, असं माझं मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()