मॅनेजमेंट स्किलिंग : कल्पनांना कृतीची जोड

कल्पनांना कृतीची जोड नसेल तर या आभासी विश्वात आपण तरंगत राहतो. हे होतं बऱ्याचदा. चर्चा घडते, विश्लेषण होतं आणि कृती करण्याची वेळ येते तेव्हा आपण कच खातो.
Light
LightSakal
Updated on
Summary

कल्पनांना कृतीची जोड नसेल तर या आभासी विश्वात आपण तरंगत राहतो. हे होतं बऱ्याचदा. चर्चा घडते, विश्लेषण होतं आणि कृती करण्याची वेळ येते तेव्हा आपण कच खातो.

कल्पनांना कृतीची जोड नसेल तर या आभासी विश्वात आपण तरंगत राहतो. हे होतं बऱ्याचदा. चर्चा घडते, विश्लेषण होतं आणि कृती करण्याची वेळ येते तेव्हा आपण कच खातो. कृतिशीलता हा व्यवस्थापकीय कौशल्याचा एक महत्त्वाचा गुण आहे. यातील एक गंमत अशी आहे की, पैशाच्या अभावी आपण कृतिशील नसणं हे मी समजू शकतो, परंतु बऱ्याचवेळा कृती न करण्यामागे चालढकलपणा किंवा ‘करू की, घाई काय आहे’ हा स्वभाव नडतो. एखादा निर्णय घेतल्यावर कृती न करण्यामागे अजून एक कारण असू शकतं आणि ते म्हणजे प्राधान्य न ठरवणे.

प्राधान्यक्रम ठरवावा

कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं हे न ठरवल्यामुळे एक वेळ अशी येते की अनेक काम आ वासून उभी राहतात आणि मग कुठलंही काम करण्याचा उत्साह मावळून जातो किंवा एखाद्या कमी महत्त्वाच्या कामामध्ये आपण वेळ घालवतो. कामाचा प्राधान्यक्रम ठरवला तर कृती अतिशय परिणामकारक ठरते. एक छोटा प्रयोग सांगतो. सकाळी काम सुरू केल्यावर कोणती कामं करायची ती लिहून काढा. त्याला १ ते ५ प्राधान्यक्रम द्या. ही प्राधान्यता सोपं किंवा अवघड या पद्धतीने करू नका तर व्यवसायाची काय गरज आहे यावरून ठरवा. पहिलं काम पूर्ण केल्याशिवाय दुसरं काम हातात घेऊ नका. त्या पाच कामाशिवाय दुसरं कुठलंही काम करू नका.

पाठपुरावा

यालाच पूरक असं कौशल्य आपल्याला शिकावं लागतं आणि ते म्हणजे चिकाटी, पाठपुरावा. काही अवघड कामं असतात. आपण ती करायची टाळतो. लहानपणी प्रश्नपत्रिका सोडवताना आपण अवघड प्रश्न शेवटी सोडविण्यासाठी राखून ठेवायचो. व्यावसायिक आयुष्यातही आपण असे प्रश्न नंतर सोडवायचे म्हणून बाजूला ठेवतो. प्रश्नपत्रिकेत हे प्रश्न सुटले नाहीत तर काही गुण वजा व्हायचे. व्यावसायिक जीवनातही हे प्रश्न न सोडविण्याची किंमत असते. तिची पत काय आहे यावरून ते काम करायचं की नाही यावर एकदा होकार आला की मग मात्र ते पूर्णत्वाला न्यायचा ध्यास ठेवणं जमायला हवं. व्यावसायिक गरजेनुसार ते काम संपवायचं कधी यावर काही पुढे मागे होऊ शकतं.

व्यावसायिक कौशल्य

मॅकडोनाल्ड ज्याने नावारूपाला आणली त्या रे क्रॉकच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आहे. त्यात रे क्रॉकच्या तोंडी एक वाक्य आहे. Perseverance beats genius. हे वाक्य खरं करणारी असंख्य उदाहरणे आपल्याला आजूबाजूला घडताना दिसतात. लौकिकार्थाने शैक्षणिक काळात बुद्धिमत्तेच्या फुटपट्टीवर फार काही चमकदार कामगिरी न करणाऱ्या अनेकांनी पुढे व्यावसायिक आयुष्यात मात्र जगाने दखल घ्यावी असं काम केलं. हे करण्यासाठी कृतिशीलता वाढवणे, कामाचं प्राधान्य ठरवणे आणि सरतेशेवटी हातात काम घेतलं की ते पूर्णत्वाकडे नेण्याचा सचोटीने प्रयत्न करणे या तीन अमूर्त व्यवस्थापकीय कौशल्यांना समजून घेऊन आत्मसात करणे हे गरजेचं आहे.

Planning without action is simply hallucinations.

- हेन्री फोर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.