करिअरच्या वाटेवर : औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम व करिअर

भारतात तरुणांची लोकसंख्या मोठी असूनही, वीस ते चोवीस वयोगटातील फक्त पाच टक्के तरुणवर्ग औपचारिक मार्गांनी व्यावसायिक कौशल्ये विकसित करतात.
Career Route
Career RouteSakal
Updated on
Summary

भारतात तरुणांची लोकसंख्या मोठी असूनही, वीस ते चोवीस वयोगटातील फक्त पाच टक्के तरुणवर्ग औपचारिक मार्गांनी व्यावसायिक कौशल्ये विकसित करतात.

- राजेश ओहोळ

भारतात तरुणांची लोकसंख्या मोठी असूनही, वीस ते चोवीस वयोगटातील फक्त पाच टक्के तरुणवर्ग औपचारिक मार्गांनी व्यावसायिक कौशल्ये विकसित करतात. याउलट, औद्योगिक देशांमध्ये ६० ते ९७ टक्के एवढे तरुण व्यावसायिक कौशल्ये विकासास प्राधान्य देताहेत. साहजिकच भारतीय औद्योगिक क्षेत्राला हवा असणारा प्रशिक्षित व कौशल्यसंपन्न मनुष्यबळ अपुरा असून, औद्योगिक प्रशिक्षण व कौशल्य यांच्या अभावामुळे पुष्कळशा तरुणांना नोकरी संधी असूनही बेरोजगार राहण्याची वेळ येते.

अभियांत्रिकी व बिनअभियांत्रिकी यामधील जवळजवळ एकशे अकरा विषयांचे (Trades) औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र अभ्यासक्रम देशभरात शिकविले जातात. सहा महिने ते तीन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमांना आठवी ते बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरतात. भारत सरकारचे रोजगार आणि प्रशिक्षण महासंचालनालय तरुणांच्या करिअर विकासासाठी वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम व योजना राबवीत आहे. असे प्रशिक्षण कार्यक्रम देशभर सातत्याने चालू असतात. जगातील विकसित राष्ट्रांच्या संयुक्त पुढाकाराने अनेक रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण योजना व कार्यक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रमाणधारकांना स्वतःचे कौशल्य अद्ययावत ठेवण्याकरिता उपयुक्त ठरतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्रधारकांना संबंधित विषयातील कार्यानुभवानंतर राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) प्रमाणपत्र मिळविता येते.

व्यवसाय, कौशल्य संपन्न कर्मचारी व तंत्रज्ञ

यांना आयटीआय व एनसीव्हीटी प्रमाणपत्र पात्रतेनंतर अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी उन्नत प्रशिक्षण संस्था (ATI) महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुंबई, हैदराबाद, कानपूर, कोलकता, लुधियाना, चेन्नई या ठिकाणी उन्नत प्रशिक्षण संस्था असून, येथे उच्चतंत्रज्ञान क्षेत्रातील विविध विषयांवर नियमित पूर्णवेळ दोन ते बारा आठवडे कालावधीचे प्रशिक्षण/ अभ्यासक्रम राबविले जातात. महाराष्ट्रात मुंबई येथील उन्नत प्रशिक्षण संस्थेत खालील विषयांतील (Trades) प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्षभर शिकविले जातात -

  • ॲडव्हान्स टूल ॲण्ड डाय मेकिंग

  • ॲडव्हान्स वेल्डिंग

  • इलेक्‍ट्रिकल मेन्टेनन्स

  • इलेक्‍ट्रॉनिक्‍स मेन्टेनन्स

  • हिट इंजिन

  • हायड्रोलिक्‍स ॲण्ड न्यूमॅटिक्स

  • इंडस्ट्रिअल केमिस्ट्री

  • मशिन टूल मेन्टेनन्स

  • मेट्रोलॉजी ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्पेक्‍शन

  • मायक्रो कॉम्प्युटर/ इंडस्ट्रिअल कंट्रोल्स

  • प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेन्टेशन

  • टूल डिझाईन

वरील अभ्यासक्रमांचा कालावधी साधारणतः एक ते सहा आठवड्यांचा आहे. दहा ते बारा उमेदवारांचा एक गट यानुसार वर्षभर वरील अभ्यासक्रम शिकविले जातात. औद्योगिक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम रोजगाराभिमुख आहेत. प्रतिकूलतेमुळे मोठ्या कालावधीचे शिक्षण ज्यांना अशक्‍य आहे त्यांना या अभ्यासक्रमांमार्फत रोजगार मिळू शकतो. रोजगारामध्ये राहून पुढे दूरस्थ किंवा अर्धवेळ अभियांत्रिकी पदविका/ पदवी अभ्यासक्रमांमार्फत करिअरचा विकास साधता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.