परदेशात शिकताना... : ह्यूमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन

ही वस्तुस्थिती आहे, की तंत्रज्ञान समाजाच्या सर्व स्तरांपर्यत खूप खोलवर पोचले असून, स्मार्ट उपकरणे आणि स्मार्ट फोन दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत.
Human Computer Interaction
Human Computer InteractionSakal
Updated on

ही वस्तुस्थिती आहे, की तंत्रज्ञान समाजाच्या सर्व स्तरांपर्यत खूप खोलवर पोचले असून, स्मार्ट उपकरणे आणि स्मार्ट फोन दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. आता अधिकाधिक लोकांना इंटरनेटचा अॅक्सेस सहज उपलब्ध झाला आहे व आता तंत्रज्ञानाचा वापर सर्वच वयोगटातील व व्यवसायातील लोक सहज करू लागले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना अतिशय चांगला अनुभव देणे, उपकरणाचे डिझाईन उत्कृष्ट ठेवणे व त्याचबरोबर तंत्रज्ञानही अद्ययावत ठेवण्यासाठी निर्मात्यांवर मोठा दबाव वाढत चालला आहे. त्यामुळेच आपल्याला आता ह्यूमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन (एचसीआय) या क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसते आहे.

या विषयावरील प्रसिद्ध झालेल्या काही लेखांमधून आपल्याला या क्षेत्रातील काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळाली आहे, जसे की मेंटल मॉडेल व्हायोलेशन, क्लोजर आणि त्याचे एसीआयमधील महत्त्व, ऑपरेटिंग सिस्टिमचे उपयोग. यातून लोकांची या विषयातील मानसिकता आता खोलवर रुजली असल्याचे दिसून येते. या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश वापरकर्त्याला केंद्रस्थानी ठेऊन डिझाईन्स तयार करणे हा आहे. यातून लोकांचे प्रश्न सुटू शकतील व त्यामागे विकसित झालेली उत्पादने लोकांचे दैनंदिन आयुष्य अधिक सुकर करतील हा आहे.

या क्षेत्राचे महत्त्व ओळखून अमेरिकेतील अनेक मान्यताप्राप्त विद्यापीठांनी ग्राहकांचा उत्पादने वापरण्याचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठीच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमाना ह्यूमन कॉम्प्युटर इंटरॅक्शनमधील एमएस म्हणून ओळखले जाते किंवा एमएस इन यूआययूएक्स असेही संबोधतात. हा अभ्यासक्रम देणाऱ्या प्रमुख विद्यापीठांमध्ये कार्नेगी मेलॉन विद्यापीठ, जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, सिएटल, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, अॅन अर्बोर, मॅचेस्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व अन्य काही संस्थांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी सामान्यपणे 3 सेमिस्टरचा असतो आणि त्यासाठी विविध क्षेत्रांतील पदवी घेतलेल्या व उद्योग क्षेत्रातील अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाते. यांमध्ये डिझाईन क्षेत्राची पार्श्वभूमी असलेले, सोशल सायन्स, बिझनेस आणि कॉम्प्युटर सायन्स आदी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()