RBI Deputy Governor Post : सरकारने RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी मागवले अर्ज, किती आहे पगार?

भारत सरकारने RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत.
RBI Deputy Governor Post
RBI Deputy Governor PostSakal
Updated on

RBI Deputy Governor Salary : भारत सरकारने RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. सध्या एम.के जैन या पदावर आहेत, त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होत आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने यासाठी 19 मार्च रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिलपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

डेप्युटी गव्हर्नरसाठी पात्रता काय असावी?

बँकिंग आणि वित्तीय बाजारपेठेतील किमान 15 वर्षांचा अनुभव असावा, असे भारत सरकारने अधिसूचनेत म्हटले आहे. त्यात खासगी क्षेत्रातीलही उमेदवार असण्याची शक्यता आहे.

मात्र, आतापर्यंत एकाही डेप्युटी गव्हर्नरची खासगी क्षेत्रातून निवड झालेली नाही. अर्जदाराचे वय 22 जून 2023 रोजी 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्जदारांच्या निकषांमध्ये पूर्णवेळ संचालक किंवा बोर्ड सदस्य म्हणून विस्तृत अनुभव असावा. आर्थिक क्षेत्रातील पर्यवेक्षण आणि अनुपालनाची अत्यंत वरिष्ठ पातळीवरील समज, आर्थिक कामगिरी डेटासह सादर करण्याची क्षमता, कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची आणि तपशीलवार माहिती सादर करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

RBI Deputy Governor Post
सर्वाना हवेहवेसे सोनेच!

पगार किती असेल?

या पात्रतेसाठी सरकारने सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार डेप्युटी गव्हर्नर पदासाठीचे संपूर्ण निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे.

सध्याचे डेप्युटी गव्हर्नरचे पद रिक्त होत असल्याने जूनमध्ये नवीन डेप्युटी गव्हर्नरची निवड होऊ शकते. अधिसूचनेनुसार, नवीन डेप्युटी गव्हर्नरचा पगार 2.25 लाख रुपये प्रति महिना असेल.

नियम देखील शिथिल केले जाऊ शकतात :

नोटीसनुसार, फायनान्शियल सेक्टर रेग्युलेटरी अपॉइंटमेंट्स सर्च कमिटी (FRRSASC) गुणवत्तेच्या आधारावर इतर कोणत्याही व्यक्तीची ओळख आणि शिफारस करण्यास स्वतंत्र आहे, ज्याने या पदासाठी अर्ज केला नाही. पात्रता समिती आणि योग्यता किंवा अनुभव निकष देखील शिथिल करू शकते.

RBI Deputy Governor Post
अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.