RBI Grade B (DEPR/DSIM) Phase 2 Result 2021 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑफिसर ग्रेड-बी फेज 2 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असून ग्रेड 'बी' (DEPR/DSIM) फेज 2 परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. दरम्यान, मुलाखतीसाठी (Interview) शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी opportunities.rbi.org.in या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार, त्यांच्या रोल नंबरनुसार ती तपासू शकतात. (RBI Grade B DEPR DSIM Phase 2 Result 2021 Officer Grade B Phase 2 Exam Result Released Check This Way)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑफिसर ग्रेड-बी फेज 2 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.
निकाल (Result) तपासण्यासाठी उमेदवाराने प्रथम अधिकृत वेबसाइटला opportunities.rbi.org.in भेट द्यावी. त्यानंतर मुख्यपेजवर उपलब्ध असलेल्या 'भरती सेक्शन'च्या ऑप्शनवरती क्लिक करावे. आता एक नवीन पेज उघडेल. येथे दिलेल्या संबंधित परीक्षेच्या निकालावर क्लिक करावे. तद्नंतर आता पुन्हा एक नवीन पेज उघडेल. येथे दोन्ही विभागांच्या मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या रोल नंबरचे स्वतंत्र दुवे उपलब्ध आहेत. दरम्यान, संबंधित लिंकवर क्लिक करून उमेदवार त्यांच्या रोल नंबरनुसार त्यांचा निकाल तपासू शकतात.
या परीक्षेसाठी 'गुण यादी व प्रवर्गनिहाय कटऑफ लिस्ट' निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर जाहीर केली जाईल. त्याचबरोबर उमेदवारांना मुलाखतीच्या वेळापत्रकाबद्दल योग्य वेळी माहिती देण्यात येईल. उमेदवारांच्या मुलाखतीची कॉल लेटर त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात येतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ग्रेड 'बी' (DEPR/DSIM) फेज 2 परीक्षा 31 मार्च 2021 रोजी घेण्यात आली. यापूर्वी फेज 1 ची परीक्षा 6 मार्च 2021 रोजी घेण्यात आली होती. त्याचा निकाल 13 मार्च 2021 रोजी जाहीर झाला आहे.
RBI Grade B DEPR DSIM Phase 2 Result 2021 Officer Grade B Phase 2 Exam Result Released Check This Way
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.