RBI Recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अनेक पदांसाठी भरतीसाठी २०२२ ची अधिसूचना जारी केली आहे. लीगल ऑफिसर ग्रेड बी, मॅनेजर, लायब्ररी प्रोफेशनल यासह अनेक पदांसाठी रिक्त जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
RBI स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) भर्ती २०२२ साठी ऑनलाइन अर्ज १५ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. पात्र उमेदवार ०४ फेब्रुवारी २०२२पर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये विविध पदांवरील एकूण 1१४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
RBI रिक्त पदांचा तपशील
ग्रेड B लीगल ऑफिसर : २ पदे
मॅनेजर (तांत्रिक-सिव्हिल): ६ पदे
मॅनेजर (तांत्रिक-इलेक्ट्रिकल): ३ पदे
लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड A मध्ये: १
ग्रेड A मध्ये आर्किटेक पद: १
कोलकाता येथील आरबीआय संग्रहालयासाठी क्युरेटर: १ पद
एकूण रिक्त पदांची संख्या - १४ पदे
कोण अर्ज करू शकते?
ग्रेड B मध्ये लीगल ऑफिसर : किमान ५० % गुणांसह कायद्यातील पदवी, २ वर्षांचा अनुभव आणि कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे.
मॅनेजर (तांत्रिक-सिव्हिल): इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (Electric Engineering) किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील (Electromics and Electric Engineering) बीई/बीटेक (BE/B.Tech)पदवी किमान ६०% गुणांसह, ३ वर्षांचा अनुभव आणि वयोमर्यादा: २१-३५ वर्षे.
मॅनेजर (तांत्रिक-इलेक्ट्रिकल): ३ वर्षाच्या अनुभवासह किमान ६०% गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये ( Archetectural Engineering) BE/B.Tech पदवी. वयोमर्यादा: 21-35 वर्षे पर्यंत.
लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड A मध्ये: कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य या विषयातील बॅचलर पदवी आणि ग्रंथालय विज्ञान (Library Science) किंवा ग्रंथालयात पदव्युत्तर पदवी. तसेच, 3 वर्षांचा अनुभव आणि 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान वयोमर्यादा आवश्यकता आहे.
ग्रेड A मध्ये आर्किटेक्ट: किमान ६०% गुणांसह आर्किटेक्चरमध्ये पदवीधर आणि वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे दरम्यान असावी.
कोलकाता येथील आरबीआय संग्रहालयासाठी क्युरेटर: इतिहास, अर्थशास्त्र, ललित कला या विषयातील पदव्युत्तर पदवी, ५ वर्षांचा अनुभव आणि वयोमर्यादा २५ ते ५० वर्षे आहे. अधिक तपशीलांसाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
वेतनश्रेणी (Pay Scale)
(A) ग्रेड 'A' अधिकाऱ्यांसाठी: सध्या, निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला मासिक एकूण वेतन HRA ची रक्कम वगळून सुमारे ९०,१०० रुपये (अंदाजे) आहे. लागू नियमांनुसार महागाई भत्ता, स्थानिक नुकसान भरपाई भत्ता, घरभाडे भत्ता, विशेष भत्ता आणि ग्रेड भत्ता यासाठी देखील ते पात्र असतील.
(b) ग्रेड 'B' अधिकार्यांसाठी: सध्या, प्रारंभिक मासिक एकूण वेतन सुमारे १,१६,६८४ रुपये (अंदाजे) आहे. याशिवाय ते वेळोवेळी लागू असलेल्या नियमांनुसार महागाई भत्ता, स्थानिक नुकसान भरपाई भत्ता, घरभाडे भत्ता, विशेष भत्ता आणि ग्रेड भत्ता यासाठी देखील ते पात्र असतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.