Andhra Pradesh High Court Recruitment 2021 : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सहाय्यक परीक्षक, टंकलेखक, कॉपीस्ट आणि परीक्षक पदांसाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत. तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या वेबसाइटला (hc.ap.nic.in) भेट देऊन अर्ज करू शकता. उच्च न्यायालयाच्या नोटिशीनुसार, एकूण 174 जागा रिक्त आहेत. या पदांवरील पात्र उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सहाय्यक परीक्षक, टंकलेखक, कॉपीस्ट आणि परीक्षक पदांसाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत.
दरम्यान, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या भरतीसाठी कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त, शासकीय तांत्रिक परीक्षा टंकलेखनातील उच्च श्रेणी म्हणजेच, 45 शब्द प्रति मिनिट टाइपिंग गतीसह इंग्रजीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालय भरती 2021 : 'अशा' आहेत रिक्त जागा
सहाय्यक - 71 पदे
टंकलेखक- 35 पदे
कॉपीस्ट- 39 पदे
परीक्षक- 29 पदे
एकूण - 174 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, शासकीय तांत्रिक परीक्षा टंकलेखनात उच्च श्रेणी उत्तीर्ण असावी अर्थात, इंग्रजी प्रति मिनिट 45 शब्दांच्या टाइपिंग गतीसह.
वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत-जास्त 42 वर्षे असावे. तर एससी, एसटी आणि ओबीसींना पाच वर्षे व अपंग उमेदवारांना किमान 10 वर्षे सूट मिळणार आहे.
अर्ज शुल्क : ओबीसी आणि इतर वर्गासाठी अर्ज फी 800 रुपये, तर एससी 500 आणि एसटी उमेदवारांना 400 रुपये अर्ज फी असणार आहे.
'अशी' होईल निवड
उमेदवारांची निवड संगणक आधारित वस्तुनिष्ठ प्रकार परीक्षेद्वारे केली जाईल. यामध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा आणि तर्कशास्त्र संबंधित प्रश्न विचारले जातील. परीक्षा 100 गुणांची असेल. यासाठी तुम्हाला 120 मिनिटे मिळतील. इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी 45 टक्के, ईडब्ल्यूएससाठी 40 टक्के, ओबीसीसाठी 35, एससी, एसटी आणि अपंगांसाठी 30 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.