IDBI बॅंकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांवर मोठी भरती!

IDBI बॅंकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांवर भरती!
IDBI Bank
IDBI BankEsakal
Updated on
Summary

आयडीबीआय बॅंकेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी.

सोलापूर : आयडीबीआय बॅंकेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. आयडीबीआय बॅंकेने (IDBI Bank) मनिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (मनिपाल) (Manipal Global Education Services Pvt Limited), बंगळूर आणि NEET एज्युकेशन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (NEET Education International Pvt Limited) ग्रेटर नोएडा यांच्याबरोबर सामंजस्य करार अंतर्गत एक वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बॅंकिंग अँड फायनान्स (PGDBF) अभ्यासक्रमासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. हा अभ्यासक्रम केल्यानंतर उमेदवारांना पीजीडीबीएफ प्रमाणपत्र (PGDBF certificate) दिले जाईल आणि आयडीबीआय बॅंकेत सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए (Assistant Manager Grade A) म्हणून नियुक्त केले जाईल.

IDBI Bank
'कोल इंडिया'मध्ये बीटेक, एमटेकसाठी 500 पेक्षा जास्त पदांची भरती

पीजीडीबीएफ कोर्सनंतर आयडीबीआय बॅंकेद्वारे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए ची एकूण 650 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर उपलब्ध ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 22 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करू शकतील. तसेच आयडीबीआय बॅंकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांसाठी ऑनलाइन चाचणी 4 सप्टेंबर 2021 रोजी घेतली जाईल आणि 27 ऑगस्ट 2021 रोजी उमेदवारांना परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्र दिले जातील.

https://www.idbibank.in/pdf/careers/Detailed-Advertisment-PGDBF-2021-22.pdf या लिंकवरून IDBI बॅंक सहाय्यक व्यवस्थापक भरती 2021 ची अधिसूचना पाहा

https://ibpsonline.ibps.in/idbiramaug21/ या लिंकद्वारे अर्ज करा

IDBI Bank
...अखेर आरोग्य मंत्रालयाने NEET-MDS समुपदेशनाचे जाहीर केले वेळापत्रक!

जाणून घ्या पात्रता

आयडीबीआय बॅंक सहाय्यक व्यवस्थापक भरती 2021 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तथापि, एससी, एसटी आणि अपंग श्रेणीतील उमेदवारांसाठी कट ऑफ गुण 55 टक्के आहे. याव्यतिरिक्त 1 जुलै 2021 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलतेची तरतूद आहे. अधिक तपशिलासाठी भरती अधिसूचना पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.