Government Job : दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; ८०हजारपर्यंत मिळणार पगार

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
BRO
BROsakal
Updated on

मुंबई : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्ससाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण ५६७ पदे भरली जातील.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार अधिकृत वेबसाइट bro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतो. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२३ आहे. (BRO Vacancy 2023)

BRO
Railway Recruitment : दहावी उत्तीर्णांना मध्य रेल्वेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

रिक्त जागा तपशील

एकूण पदे - ५६७

रेडिओ मेकॅनिक - २ पदे

ऑपरेटर कम्युनिकेशन - १५४ पदे

ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट - ९ पदे

वाहन मेकॅनिक - २३६ पदे

MSW ड्रिलर - ११ पदे

MSW मेसन - १४९ पदे

MSW पेंटर - ५ पदे

MSW वेटर - १ पोस्ट

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय सर्व पदांच्या भरतीसाठी वेगवेगळ्या पात्रता देण्यात आल्या आहेत.

BRO
CRPF Recruitment : बारावी उत्तीर्णांना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

BRO भरती २०२३

वय मर्यादा

ज्या उमेदवाराला या पदांसाठी अर्ज करायचा असेल, त्याची वयोमर्यादा १८ वर्षे ते २७ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून ५० रुपये भरावे लागतील, तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

पगार

निवडलेल्या सर्व उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाईल. उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० रुपये वेतन दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.