BSF Job : बीएसएफमध्ये १२८४ पदांसाठी भरती; ७० हजारांपर्यंत पगार घेण्याची संधी

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
BSF
BSFgoogle
Updated on

मुंबई : सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF १२८४ पदांसाठी भरती करत आहे. ज्या उमेदवारांना या पदांच्या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा. कारण चुकीच्या पद्धतीने भरलेला फॉर्म विभागाकडून स्वीकारला जाणार नाही. तसेच, उमेदवारांनी देय तारखेपर्यंत अर्ज करावेत. कारण त्यानंतर अर्जाची विंडो बंद होईल. (recruitment in BSF for 1284 posts)

अधिसूचनेनुसार, ही भरती महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी आहे. १२०० जागा पुरुष उमेदवारांसाठी आहेत तर ६४ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत. हेही वाचा - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

BSF
GAIL Job : 'गेल इंडियामध्ये' भरती; २ लाखांपर्यंत पगार घेण्याची संधी

वय

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. उमेदवार अधिसूचनेवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

निवड प्रक्रिया

लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

BSF
Air India : 'एअर इंडिया'मध्ये मोठी भरती ! ५ हजार १०० जणांना मिळणार नोकरी

असा करा अर्ज

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जा.

भरती लिंकवर क्लिक करा.

वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून सबमिट करा.

BSF फॉर्म भरा आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर अंतिम सबमिट करा आणि फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()